घरमहाराष्ट्रनाशिक'गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करू देणार नाही'; ग्रामस्थ आक्रमक

‘गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करू देणार नाही’; ग्रामस्थ आक्रमक

Subscribe

नाशिक : गिरणा नदीपात्रात वाळू शिल्लक राहिली तरच आमच्या शेतीसाठीच्या पाण्याचे स्रोत टिकून रातील, अन्यथा आमचा शेती व्यवसाय उद्ध्वस्त होऊन जगणं मुश्किल होईल, त्यामुळे आमच्या गिरणा नदी लगतच्या शिवार काठावरील गिरणा नदीतील वाळूचा एक कणही आम्ही उपसा होऊ देणार नाही, भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा गावातील तरुण एकवटले आहेत.

मागील १०,१२ वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने अनेक वेळा वाळू उपशाच्या निविदा काढण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक वेळी भऊर बगडु, विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहोणेर, ठेंगोडा शिवारातील शेतकर्‍यांनी तिव्र विरोध करत निषेध केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते. गेल्या दोन- तीन वर्षांपासून महसूल विभागाने प्रांत अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांना या सर्व गावकर्‍यांनी ग्रामसभेचा ठराव संमत करून विरोध दर्शविला आहे.
लोहोणेर, विठेवाडी, ठेंगोडा, सटाणा, सावकी खामखेडा गावातील पिण्याच्या पाण्याच्या विंधन विहिरी याच गावातील नदीच्या काठावर आहेत. काही प्रस्तावित योजनाही राबविल्या जाणार आहेत. अशा बिकट परिस्थितीत महाराष्ट्र शासनामार्फत शहरवासियांना सवलतीच्या दरात वाळूचा ठिय्या करून देण्याचा घाट घातला जात आहे तो आम्हाला मान्य नाही, रात्री-बेरात्री वाळू माफियांकडून रोज शेकडो ब्रास वाळू उपसा होत आहे. त्याकडे महसूल विभागाचे साफ दुर्लक्ष आहे, तो अवैध वाळू उपसा आदी थांबवावा अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

कुठल्याही परिस्थितीत या चार गावांतून कोणत्याच मार्गाने वाळू उपसा होऊ दिला जाणार नाही, भले त्यासाठी रक्त सांडण्याची वेळ आली तरी चालेल. असा एकमुखी निर्णय तालुक्यातील भऊर, विठेवाडी, खामखेडा, सावकी व इतर गावातील नागरिकांनी घेतला. रविवारी (दि.७) रोजी या गावातील नागरिकांनी गिरणा नदीपात्रात उतरत वाळू उपसा करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. नवीन वाळू धोरणानुसार देवळा तालुक्यात चार घाटांवर साधारणता चाळीस ते पन्नास हजार ब्रास वाळूसाठी निविदा प्रक्रिया काढल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अवैध वाळू उपशाची चोरी रोखण्यासाठी शासनाने स्वतः वाळू धोरण ठरवून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. निविदा काढून अमर्याद वाळू उपसा होण्याची शक्यता घेऊन ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.

भविष्यात जर का अशा प्रकारे वाळू उपसा झाला तर सर्व विंधन विहिरी कोरड्याठाक पडतील, उन्हाळ्यात पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहणार नाही, या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठावरील काही गावातील प्रतिनिधी व शेतकर्‍यांनी एकत्र येत घाटावरील वाळू उपसा करण्याश तीव्र विरोध दर्शवला आहे. येत्या काही दिवसांत गावोगाव बैठका, ग्रामसभा, घेऊन ग्रामसभेचे ठराव मंजूर करून तहसिलदार, प्रांत, जिल्हा अधिकारी, महसूलमंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येईल.

- Advertisement -

यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनकर निकम, बाजार समितीचे संचालक अभिमन पवार, सरपंच वैभव पवार, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष पवार, नितीन पवार, पांडुरंग पवार, गंगाधर पवार, माजी सरपंच दादा मोरे, मिलिंद पवार, राजेंद्र पवार, बाजार समितीचे माजी संचालक बाबुराव निकम, संजय पवार, पोपट पवार, दला पवार, खंडू माळी, नामदेव पवार, रवींद्र पवार, शशिकांत निकम, विलास निकम, राजेंद्र निकम, भास्कर निकम, विठोबा सोनवणे, दादाजी सोनवणे, धना निकम, संजय निकम, काशिनाथ बोरसे, श्रावण बोरसे यांच्यासह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाळू लिलावा संदर्भात आज महत्त्वाची बैठक

सर्व विठे्वाडी भऊर ,सावकी,खामखेडा, येथिल शेतकरी व ग्रामस्थांना कळविण्यात येते की, शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार आपल्या गिरणा नदीपात्रातील विठेवाडी, भऊर सावकी खामखेडा या गावाच्या काठावरील गिरणा नदीतून वाळू उपसा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यास आपण अनेक वेळा सामुदायिक विरोध दर्शवला आहे.तसा ठराव ही अनेक वेळा संमत करून शासनाला कळविण्यात आले आहे,त्या अनुषंगाने तशा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. या गोष्टीची दखल घेत चांदवड-देवळा चे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख हे चारी गावातील ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्यासाठी आज विठेवाडी गावातील जाग्रुत देवस्थान येथे सकाळी १० वा. येणार आहेत. तेव्हा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेऊन गावाच्या व आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन गिरणा परिसरातील विठेवाडी, भउर सावकी खामखेडाच्या ग्रामस्थांनी केले आहे.

शासनाने वाळू उपसाबाबत घेतलेला निर्णय आम्हास अमान्य असून जर तसा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल आणि एवढे करूनही शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर प्रसंगी आम्ही आत्मदहन ही करू असा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. वाळू लिलाव होऊन तसा उपसा सुरू केल्यास नदीतील पाणी वाहून जाईल त्यामुळे येथील पाणी रोखून करण्यासाठीचे स्रोत नष्ट होतील,परीणामी नदी काठावरील शेती उद्ध्वस्त व उजाड होईल. त्यामुळे येथून वाळू उपसा करण्यास आमचा सक्त विरोध आहे. : सुनील पवार, उपजिल्हाप्रमुख शिवसेना (ठाकरे गट)

वाळूची अवैध तस्करी रोखण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकारने गिरणा नदीतील हजारो ब्रास वाळू, निविदा पद्धतीने प्रकिया राबवून ठिय्या करून शहरातील जनतेला सवलतीने पुरवठा करण्याचा घाट घातला जात आहे. आधीच वाळू माफियांनी अवैधरित्या हजारो ब्रास वाळूचा उपसा करून गिरणेचे पात्र ओसाड केले आहे. थोडीफार वाळू शिल्लक आहे, तिही उचलली गेली तर हा हिरवागार परिसर उजाड झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत चार-पाच गावांतील शेतकरी व ग्रामस्थ लिलाव होऊ देणार नाही, यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. : कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -