घरमुंबई1992-93 सारखी दंगल घडवण्याचा उद्धव ठाकरेंचा होता आदेश; नितेश राणेंचा थेट हल्ला

1992-93 सारखी दंगल घडवण्याचा उद्धव ठाकरेंचा होता आदेश; नितेश राणेंचा थेट हल्ला

Subscribe

मुंबई : 1992-93 सारखी दंगल घडवण्याचा उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackera) आदेश होता. त्या बैठकीमध्ये स्थानिय लोक अधिकार समितीचे माजी सरचिटणीस आणि आता शिवसेनेचे खासदार ज्यांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले ते आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली होती, असा मोठा आरोप भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंवर केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, महायुती सरकार राज्य अशांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, राज्यामध्ये दंगली भडकवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माणसांनी म्हणजे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी वारंवार केला. पण मी आज एक इतिहास उद्धव ठाकरेंना तारखेसकट आमि माणसांसकट सांगणार आहे. 13 ऑगस्ट 2004 रोजी मातोश्रीमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्थानिय लोक अधिकार समितीचे माजी सरचिटणीस आणि आता शिवसेनेचे खासदार ज्यांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे ते आणि स्वत: उद्धव ठाकरे या तिघांमध्ये मातोश्रीमध्ये बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले की, 1992-93 च्या दंगली जशा घडल्या त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आली तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. त्या ठिकाणी संबंधित दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितले की, चर्नी रोड आणि त्या परिसरातील काही भागात जे काही मुसलमान फेरीवाले आहेत त्यांच्यावर वस्तऱ्याने हल्ला करा आणि त्यानंतर मुंबईमध्ये दंगली घडवण्याची जबाबदारी माझी असेल. हे स्वत: उद्धव ठाकरे म्हणाले होते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे मुसलमानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. मुसलमानांवर हत्याराने वार करा, तलवारीनी त्यांच्यावर हल्ला करा, जेणेकरून हिंदू मुसलमान दंगली भडकतील आणि त्या दंगलीचा फायदा शिवसेनेला होईल आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनता येईल, हा आदेश त्यांनी दिला होता का? मी संबंधित खासदराला माझ्यासोबत बसवू शकतो आणि संबंधित माजी सरचिटणीसला समोर उभ करू शकतो आणि अशी मिटिंग 13 ऑगस्ट 2004 ला झाली होती का हा प्रश्न मला या निमित्ताने उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे. तुम्ही सांगा मला ही माहिती खरी आहे की नाही. गेल्या 9 महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या दंगली घडत आहेत, महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे, यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीचा काही हात आहे का हे या गृहविभागाने तपासले पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भडकलेली दंगल, रामनवमी निमित्त मालवणीमध्ये भडकलेली या सर्व दंगलीमध्ये उद्धव ठाकरेंचा हात आहे का, हे गृह विभागाने तपासले पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -