घरमहाराष्ट्रTeachers Recruitment : शिक्षक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, भरती प्रक्रियेचा मुहूर्त निघाला

Teachers Recruitment : शिक्षक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, भरती प्रक्रियेचा मुहूर्त निघाला

Subscribe

मुंबई : राज्यातील शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून गदारोळ सुरू आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा महिन्याभरापूर्वी एका महिला शिक्षिक उमेदवारासोबत भरती प्रक्रियेच्या मुद्द्यावरून वाद झाल्याने गदारोळ झाला होता. परंतु, आता राज्यातील शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण शासनाला राज्यातील शिक्षक भरतीचा मुहूर्त सापडला आहे. ज्यामुळे आता शिक्षक भरतीची तारिख निघणार असून शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. (Good news for teacher candidates, the time for recruitment process has started)

हेही वाचा… Police Constable Recruitment : पोलीस विभागात 17,471 जागा भरणार; बेरोजगारांना मोठी संधी

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासन 20 हजारांपेक्षा अधिक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. आजच ही जाहिरात निघण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे एक हजार खासगी शिक्षण संस्थांमधील 20 हजारांहून अधिक जागांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षक भरती अंतर्गत तब्बल 16 हजार 500 जागांवर मुलाखती न घेता भरती केली जाणार आहे. उर्वरित जागांवर मुलाखती घेऊन नियुक्त्या केल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे. या शिक्षक भरती अंतर्गत जिल्हा परिषदेसोबतच खासगी शिक्षण संस्थेच्या जागांवरसुद्धा पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आगामी लोकसभेच्या अनुषंगाने शासनाकडून आता वेगवेगळ्या विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यातच पोलीस शिपाई विभागात भरती केली होणार असल्याची माहिती समोर आली होती. राज्याच्या पोलीस विभागात शिपाई संवर्गातील 17 हजार 471 जागांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. या भरतीची परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील आठवड्यात बुधवारी (ता. 31 जानेवारी) गृह विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने पोलीस शिपाई संवर्गातील 100 टक्के रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभागाच्या 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -