घरमहाराष्ट्रखुशखबर! आर्थिक दुर्बल घटक आणि ओबीसी समाजातील मुलींची पूर्णपणे फी माफ होणार

खुशखबर! आर्थिक दुर्बल घटक आणि ओबीसी समाजातील मुलींची पूर्णपणे फी माफ होणार

Subscribe

मुंबई : राज्यातील आर्थिक दुर्बल घटक आणि ओबीसी समाजातील मुलींसाठीची 100 टक्के फी माफ करण्यात यावी, अशी शिफारस राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रस्ताव देण्याचे आदेश दिले होते. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी 642 कोर्सेससाठी 1 हजार कोटी रुपयांचेपक्षा जास्तीची तरदूत करण्याची माहिती मिळाली आहे.

परभणीच्या एका तरुणीने फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिने आत्महत्या केली. त्या तरुणीने सुसाईट नोटमध्ये लिहले होते की, माझी आर्धी फी सरकारकडून भरली जाते. त्याबद्दल मी सरकारचे आभार मानते. पण उर्वरित 50 टक्के फी भरायला माझ्या पालकांकडे पैसे नाहीत, असे त्या तरुणीने लिहले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री आर्थिक दुर्बल घटक आणि ओबीसीतील मुलींसाठी 100 टक्के फी माफीचा प्रस्ताव देण्यास सांगितला.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेब आज असते तर त्यांनीही पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं असतं; का म्हणाले मुख्यमंत्री असं

आज मंत्रिमंडळाचा बैठक पार पडली. या बैठकीतसंदर्भात माध्यमाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली की, राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती दिली असून यासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -