घरमहाराष्ट्रभोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरता? पडळकरांचा सेनेला सवाल

भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरता? पडळकरांचा सेनेला सवाल

Subscribe

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘सामना’तील अग्रेलखावरुन शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी राऊतांना केला आहे. राज्यात सध्या राणे आणि शिवसेना वाद शिगेला पोहोचला आहे.

शिवसेनेने नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना भोकं पडलेला फुगा असा टोला लगावला. यावरुन पडळकरांनी जोरदाना टीकास्त्र डागलं आहे. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असंतर नाही की, राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल, असा हल्लाबोल पडळकरांनी केला. यावेळी त्यांनी पोलिसांना आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या दिल्याचा आरोप करत वरूण देसाईंवर कारवाई का नाही? असाही सवाल केला.

- Advertisement -

सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर

गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर टीका करताना ‘सामना’चं रुपांतर ‘बाबरनामा’मध्ये केल्याची टीका केली आहे. मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते. माननीय संजय राऊत कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला. अन्यथा, ‘तुमच्या हम करे सो कायद्या’च्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील,” अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर केली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -