घरमहाराष्ट्रआपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल...

आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल – पडळकर

Subscribe

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मानवंदना देताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रस्थापितांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल, असं पडळकर म्हणाले. सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्या पर्यंत पोहचू देत नाहीत, असं देखील पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “आजचा दिवस या देशातील दुर्बल वंचिताना प्रेरणा देणारा आहे. कारण आज परमपुज्य विश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. डॉ. बाबासाहेबांनी वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, प्रस्थापितांकडून होणारे त्यांचे शोषण थांबले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानात तशी तजविज केली. पण आजही सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्या पर्यंत पोहचू देत नाहीत. जेंव्हा आम्ही आवाज उठवतो तेंव्हा आमच्यावरती जीवघेणे हल्ले होतात. आमच्या मेंढपाळांवर हल्ले होतात. वंचित समूहावर ॲट्रोसिटीच्या घटनाही वाढयला लागतात. आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला दाबले जाते. पण तरिही बाबासाहेबांचे स्मरण करून सगळ्या संकटावर मात करत आपल्याला आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल. तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

- Advertisement -

प्राध्यापक भरतीमध्ये ओबीसींना न्याय मिळेल अशी अपेक्षा

हाराष्ट्रात ओबीसी, भटके विमुक्त उमेदवारांसाठी महत्वाचा दिवस आहे. राज्यात प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण लागू झाले आहे. केंद्रात हा कायदा आधीच लागू होता पण महाआघाडी सरकारला यासाठी तीन वर्ष लागली. विधी मंडळात जेव्हा याचे विधेयक मांडले त्यावर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या विधेयकाला संपूर्ण पाठींबा दिला. एकमतानं हे विधेयक पारित झाले. महामहिम राज्यपालांची मी १८ जानेवारीला भेट घेतली. या विधेयकावर सही करून आपण ओबीसींना न्याय द्यावा, अशी मागणी केली. या कायद्यामुळे आगामी प्राध्यापक भरतीमध्ये ओबीसींना न्याय मिळेल अशी अपेक्षा करू, असं पडळकर म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -