घरमहाराष्ट्रनाशिकशिवसेना नेते संजय राऊत उद्या नाशिकमध्ये

शिवसेना नेते संजय राऊत उद्या नाशिकमध्ये

Subscribe

दोन दिवसीय दौरा : विविध विकास कामांचे भूमिपूजन

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवार (दि.15) पासून दोन दिवस नाशिक दौर्‍यावर येत आहेत. शिवसेनेच्या कोअर कमिटीची बैठक घेणार असून, नंतर ते फाळके स्मारकाची पाहणी करणार आहेत.
राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिकमध्ये येत असल्याने त्यांच्या दौर्‍याकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यांनंतर सायंकाळी 4.30 वाजता दादासाहेब फाळके स्मारकाची पाहणी ते करणार आहेत. या प्रभागाच्या माजी नगरसेविका संगीता जाधव यांनी उभारलेल्या भागवत सभागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता बाळा दराडे यांच्याकडे रस्ते लोकार्पण व सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे भूमीपूजन केले जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता नंदिनी नदी संरक्षण जाळी कामाचे लोकार्पण व भूमिगत तारा टाकण्याची सुरुवात करण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी माजी नगरसेविका सीमा ताजने यांच्या प्रभागात रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12 वाजत ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता ‘आयएमए’च्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रभागातील नैसर्गिक नाला, केबिन हॉल यांचे भूमीपूजन व उध्दाटन खासदार राऊत यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ते मुंबईकडे रवाना होतील.
विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त खासदार राऊत नाशिकमध्ये येत असले तरी शिवसैनिकांना ते काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -