घरठाणेUlhasnagar Firing : महेश गायकवाडांना रुग्णालयातून डिस्चार्ज; 'टायगर अभी जिंदा है' कल्याण-डोंबिवलीत...

Ulhasnagar Firing : महेश गायकवाडांना रुग्णालयातून डिस्चार्ज; ‘टायगर अभी जिंदा है’ कल्याण-डोंबिवलीत बॅनरबाजी

Subscribe

जमिनीच्या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यासाठी 2 फेब्रुवारीला भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हानगरमधील हिल लाइन पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता.

ठाणे : उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या गोळीबारीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले होते. यात गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे ठाण्यातील कल्याण विभाग शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता, यात हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. या दोघांवर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आता महेश गायकवाड आणि राहुल पाटील या दोघांना रुग्णालयातून तब्बल 14 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कल्याण- डोंबिवलीमध्ये बॅनरबाजी करत त्यांचे स्वागताची तयारी केली आहे.

कल्याण पूर्वमध्ये महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहे. ‘ गोर गरीबाचा कैवारी’… ‘टायगर इज बॅक’, हेच प्रेम हेच आशीर्वाद, जनतेचा रथ पुन्हा लवकरच मैदानात येणार, महेश गायकवाड कल्याणकर तुमचे स्वागत करीत आहोत, अशा आशयाचे बॅनर सगळीकडे झळकत आहेत तर, दुसरीकडे महेश गायकवाड शहर प्रमुख, माजी नगरसेवक, भावी आमदार अशा आशयाचे बॅनरही काही ठिकाणी लावले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : जुमला आणि नरेंद्र मोदी एकाच नाण्याच्या दोन बाजू, राऊतांची खोचक टीका

काय आहे प्रकरण?

जमिनीच्या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यासाठी 2 फेब्रुवारीला भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हानगरमधील हिल लाइन पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील दोघेही गंभीर जखमी झाले होते. यानंतर दोघांना उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले होते. गेल्या 14 दिवसांपासून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर उपचार सुरू होते. तब्बल 14 दिवसानंतर महेश गायकवाड व राहुल पाटील हे दोघेही दुपारी घरी येणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि समर्थकांकडून दुपारी त्यांचे जंगी स्वागत करत शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -