घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मीनाताई ठाकरे यांना अभिवादन, ट्वीट करत म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मीनाताई ठाकरे यांना अभिवादन, ट्वीट करत म्हणाले…

Subscribe

मुंबई – राज्यात राजकीय संघर्ष सुरू असताना शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष आणि चिन्ह स्वतःच्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आपण जपत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. तर, आता मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनी एकनाथ शिंदे यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंकडून खेळी! अंधेरी पूर्वेत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून उमेदवारी जाहीर

- Advertisement -

सर्व शिवसैनिकांची मायेची सावली, सर्वांची माऊली स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना स्मृतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन असं ट्वीट करत एकनाथ शिंदे यांनी मीनाताई ठाकरे यांना अभिवादन केले आहे.


बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारस आम्हीच, असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. तसंच, बंडखोरी केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाकडून म्हटलं जातंय. त्यामुळे शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे प्रकरण प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोग कोणतीही सुनावणी घेऊ शकत नाही. शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर, निवडणूक आयोगावर सुनावणीसाठी घातलेले निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने हटवावेत अशी मागणी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -