घरताज्या घडामोडीGunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्लाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयाने सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ४ दिवसांपासून सदावर्ते पोलीस कोठडीत होते. मात्र, आता पोलिसांच्या विनंतीनुसार सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडेही देण्यात आला आहे. सदावर्ते यांना ऑर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आल्यानंतर आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात फलटण येथे सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना गुन्ह्याच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र ते गैरहजर राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करत सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्याचे निर्देश आर्थर रोड जेल प्रशासनाला दिल होते.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना निर्माण झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सदावर्ते यांचा ताबा घेतला. आता त्यांना साताऱ्यात पोलीस घेऊन जात आहेत. सदावर्ते यांना सातारा पोलिसांना चौकशीसाठी किती दिवस द्यायचे याचा निर्णय जिल्हा सत्र न्यायालय घेणार आहे.

- Advertisement -

मुंबईच्या सत्र न्यायालयात जो युक्तिवाद झाला. त्यानुसार मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये पोलिसांकडून पूर्ण चौकशी करण्यात आली. त्यामुळे इतर प्रकरणात मुंबई परिसरात विविध कलम दाखल केले जात आहेत.

सदावर्तेंच्या अडचणीत वाढ

गुणरत्न सदावर्ते यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करुन त्यांच्या अडचणी वाढवण्यात येत असल्याचा युक्तिवाद सदावर्तेंच्या वकिलांनी केला. तर सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी केली. सदावर्ते यांच्याविरोधात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. आरोपींची आणि सदावर्ते यांची समोरा समोर बसवून चौकशी करायची आहे. असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

सदावर्तेकडून मृण्मयी कुलकर्णी यांनी गिरगाव कोर्टातील ४० नंबरच्या न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायाधीश नदीम मेमन यांच्यापुढे ही सुनावणी झाली. सरकारी पक्षाने आपल्या वतीने पूर्ण प्रयत्न केला की, सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी परंतु न्यायालयाने नकार देत सदावर्तेंना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा : gunratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, सदावर्तेंचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -