घरमहाराष्ट्रमोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातील गुन्हेगारांवर गुन्हा कधी दाखल होणार?, राऊतांचा सवाल

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातील गुन्हेगारांवर गुन्हा कधी दाखल होणार?, राऊतांचा सवाल

Subscribe

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील गुन्हेगारावर गुन्हा कधी दाखल होणार, असा सवाल शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. आहे. मागिल वर्षी मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत भाजपचे नेते व गुजरातचे माजी गृहमंत्री आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला होता.

डेलकर आत्महत्या प्रकरणी मुंबईत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन सवाल केला आहे. “एका कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या प्रकरणात कर्नाटकचे मंत्री इस्वराप्पा यांच्या विरुद्ध FIR दाखल. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात संबंधित गुन्हेगारांवर FIR कधी होणार?,” असा सवाल संजय राऊत यांनी ट्विट करत केला आहे.

- Advertisement -

कोण होते खासदार मोहन डेलकर?

मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे एकमेव विद्यमान खासदार होते. डेलकर यांनी कामगार संघटनेचा नेता त्यांची कारकीर्द म्हणून सुरु केली होती. आदिवासी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. १९८५ मध्ये त्यांनी आदिवासी विकास संघटना स्थापन केली. १९८९ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले, अपक्ष म्हणून त्यांनी दादरा आणि नगर हवेली मतदारसंघातून विजयी झाले होते. १९९१ ते १९९६ दरम्यान दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी पुन्हा अपक्ष लोकसभा निवडणूक लढवत विजय संपादन केला. २००४ मध्ये भारतीय नवशक्ती पक्षाकडून ते पुन्हा लोकसभेवर गेले. ४ फेब्रुवारी २००९ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत, अपक्ष निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा खासदार झाले. २०२० मध्ये मोहन डेलकर यांनी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला होता.

- Advertisement -

इश्वरप्पा काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील भाजप सरकारमधील मंत्री कमिशनसाठी छळ करत असल्याची तक्रार करणाऱ्या एका कंत्राटदाराचा उडपी येथील एका हॉटेलात संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. ईश्वरप्पा हे कर्नाटकमधील ग्रामीण विकास खात्याचे मंत्री आहेत. वर्षभरापूर्वी केलेल्या कामाची बिले मंजूर करण्यासाठी मंत्रीमहोदय ४० टक्के कमिशन मागत होते. ‘या कमिशनखोरीची तक्रार पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहांपासून भाजपच्या सर्वच नेत्यांकडे करूनही कोणी त्याची दखल घेत नाही. त्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत. आपल्याबाबत काही घटना घडली तर ईश्वरप्पा यांना जबाबदार धरावे,’ असे मृत संतोष पाटीलने चिठ्ठीत लिहिले.


हेही वाचा – विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच दिलासा देण्याचे गंभीर प्रकार, न्यायव्यवस्थेमध्ये एकाच विचाराचे लोक; राऊतांचा गंभीर आरोप


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -