घरक्राइमश्रद्धाच्या शरीराची विटंबना माणुसकीला काळीमा फासणारी, आफताबला फाशी द्या; रुपाली चाकणकरांची मागणी

श्रद्धाच्या शरीराची विटंबना माणुसकीला काळीमा फासणारी, आफताबला फाशी द्या; रुपाली चाकणकरांची मागणी

Subscribe

श्रद्धाच्या शरीराची विटंबना करणाऱ्या अफताभला फाशीची शिक्षा देण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. मुंबई नजीकच्या वसई परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरची दिल्लीत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

श्रद्धाच्या शरीराची विटंबना करणाऱ्या अफताभला फाशीची शिक्षा देण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. मुंबई नजीकच्या वसई परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरची दिल्लीत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याला अटक करण्यात आली असून त्याने ज्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकले आहेत तिथे तपास सुरू आहे. (Hang Aftab Who Mutilated Shraddha Body Demand By Rupali Chakankar Shraddha Murder Case)

आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची माहिती समोर येताच तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात असून, आरोपी आफताबवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अफताभला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच, त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत झालेली निर्घुण हत्या आणि त्यानंतर तिच्या शरीराची झालेली विटंबना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. ही तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी या घटनेचा तपास करत आरोपीचा छडा लावण्यात यश मिळवले. पण यामध्ये या घटनेतील ठोस पुरावे आणि आरोपीविरोधात सशक्त दोषारोपपत्र सादर करण्याचे खरं आव्हान आहे”, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

- Advertisement -

याबाबत राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाला पत्राद्वारे कळवले आहे. तसेच, “या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा”, असेही या पत्रात नमूद केलेले आहे. या घटनेबाबत राज्य महिला आयोग सातत्यानं पाठपुरावा करणार असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – मेहरौलीच्या जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे ११ तुकडे सापडले, तपासकार्यात सीबीआयची एन्ट्री

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -