घरमहाराष्ट्रHasan Mushrif: भर सभेत हसन मुश्रीफ अजित पवारांसमोर ढसाढसा रडले; कारण काय?

Hasan Mushrif: भर सभेत हसन मुश्रीफ अजित पवारांसमोर ढसाढसा रडले; कारण काय?

Subscribe

मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आलेले शेतकरी, महिला आणि कार्यकर्त्यांसमोरच पालकमंत्री हसन मुश्रीफ ढसाजढसा रडले.

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील मौजे सांगाव येथे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात एक भावनिक घटना घडली. मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आलेले शेतकरी, महिला आणि कार्यकर्त्यांसमोरच पालकमंत्री हसन मुश्रीफ ढसाढसा रडले. (Hasan Mushrif Hasan Mushrif cried profusely in front of Ajit Pawar What is the reason)

आजपर्यंत अजितदादांनी अनेकवेळा मंत्रिमंडळात संधी दिली, पण कोल्हापूरचा पालकमंत्री होता आलं नव्हतं, ती सुद्धा संधी दादांनी दिली, मी शब्द देतो महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही, असा निर्धार कोलहापूरचे पालकमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला. विकासाच्या बाबतीत कोलापूरला मागे ठेवणार नाही, अंबाबाई मंदिर विकास आराखडा आपण येत्या बजेटमध्ये मंजूर करा, असं आवाहनही मुश्रीफ यांनी अजित पवार यांना केलं. दादा आप आये, बहार आयी. प्रोत्साहनपर अनुदानामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या योजनेबाबत एक बैठक घेण्याची गरज आहे, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं.

- Advertisement -

अन् भर सभेत मुश्रीफ रडले

हसन मुश्रीफ म्हणाले की, तुमच्या (अजित पवार) ताकदीवर अनेक संकट पेलून उभा आहे. या जनतेचा मी आभारी आहे. राजकीय जीवनात दोन मोठी संकटं माझ्यावर आली. या काळातही जनताच माझ्यासोबत राहिली, असं सांगताना मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे भाषण करता करता हसन मुश्रीफ रडले. आजपर्यंत जी खाती मिळाली त्यात ऐतिहासिक काम करण्याचं भाग्य मला मिळाल्याचं मुश्रीफ म्हणाले. यावर उत्तर देताना, अजित पवार यांनी उद्याच प्रामाणिक कर्जफेडबाबत तांत्रिक अडचणींवर चर्चा करणार असल्याचं सांगितलं.

दादांनी घेतलेली भूमिका योग्य

मुश्रीफ यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी फोडून भाजपाला मांडीला मांडी लावून बसलेल्या अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, अचानक एक राजकीय भूकंप ऑगस्ट महिन्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वाढवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली. ही भूमिका घेतल्यानंतर मतदारसंघातील जनतेनं मला समजून घेतलं.

- Advertisement -

(हेही वाचा: Pawar Vs Pawar : शरद पवारांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत…; रोहित पवारांचे ‘दादां’ना खरमरीत पत्र )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -