घरमहाराष्ट्रपुणेRavindra Dhangekar : आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल; महापलिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं...

Ravindra Dhangekar : आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल; महापलिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं भोवलं

Subscribe

महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत निवडून आलेले आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र आहे. कारण, पुण्यात एका कार्यक्रमात महापलिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे त्यांना भोवले आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ravindra Dhangekar Case registered against MLA Ravindra Dhangekar Abusing the Municipal Officer)

महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यात आल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला करणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, पुण्यातील आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाचा कार्यक्रमात काँग्रेसला डावलल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे महापालिकेच्या अभियंता संघाने याचा निषेध केला तसेच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आमदार धंगेकर व इतर कार्यकर्त्यांवर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी फिर्याद दिली होती.

हेही वाचा : Pawar Vs Pawar : शरद पवारांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत…; रोहित पवारांचे ‘दादां’ना खरमरीत पत्र

- Advertisement -

भाजपने केली होती कारवाईची मागणी

आमदार धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. हा व्हिडिओ ट्वीट करत भाजपचे माजी आमदार मुरलीधर मोहोळ यांनी टीका देखील केली होती. महापालिकेच्या अभियंता संघाने सोमवारी महापालिकेत सभा घेऊन या प्रकरणाचा निषेध करत त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : Tata Power Company : घरगुती वीजदर वाढण्याची शक्यता, छोट्या घरगुती ग्राहकांवर अधिक भार

कोण आहेत रवींद्र धंगेकर?

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कसब्यातून निवडून आलेले भाजपचे तत्कालीन उमेदवार दिवंगत गिरीश बापट यांच्याविरोधात त्यांचा अल्पशा फरकाने पराभव झाला होता. धंगेकर तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. धंगेकर हे राज ठाकरे यांचे विश्वासू राहिले आहेत. रवींद्र धंगेकर हे पाच वेळा नगरसेवक असून त्यांनी पुणे महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -