घरमहाराष्ट्रपुराचे पाणी शेतकर्‍यांचा डोळ्यात

पुराचे पाणी शेतकर्‍यांचा डोळ्यात

Subscribe

पाऊस पुराचा फटका ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भातशेतीला बसला. पावसामुळे हजारो हेक्टर भातशेतीची रोपे पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

भातसा नदीच्या पुरामुळे नदीलगतची गावेच्या गावे पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्‍यांनी शेतात हलवार, गरवा या प्रकारातील अनेक भाताच्या वाणाची लागवड केली होती. त्याचबरोबर नागली, वरई , उडीद, खुरासनी या पिकांची लागवडही केली होती.

- Advertisement -

ठाणे पालघरमध्ये सव्वालाख हेक्टर क्षेत्राला फटका
ठाणे आणी पालघर जिल्ह्यात जवळपास सव्वा लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली होती. यातील बहुतांश भातशेती पाऊस व पुराच्या तडाख्यात नष्ट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. नुकसान झालेल्या भातशेतीची प्रशासनाने त्वरीत पाहणी करुन शेतकर्‍यांना राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

जोरदार पावसामुळे शेतीचे बांध फुटून लागवड केलेला भात पाण्यात बुडाला आहे. काही ठिकाणी प्रवाहात आलेली माती शेतात आल्याने भातरोपांचे नुकसान झाले आहे.
– बाळाराम धानके (शेतकरी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -