घरमुंबईपावसाचा सरपटणाऱ्या प्राण्यांनांही फटका; ३३४ सरपटणारे प्राणी रेस्क्यू

पावसाचा सरपटणाऱ्या प्राण्यांनांही फटका; ३३४ सरपटणारे प्राणी रेस्क्यू

Subscribe

मुंबईसह अनेक भागात कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसाच परिणाम प्राणी जीवनावर ही होताना दिसत आहे. आतापर्यंत ३३४ सरपटणारे प्राणी रेस्क्यू करण्यात आले आहे.

मुंबईसह अनेक भागात कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसाच परिणाम प्राणी जीवनावर ही होताना दिसत आहे. गडगडणाऱ्या ढगांसह कोसळणाऱ्या पावसाचा फटका प्राणी, पक्षी आणि सरपटणार्‍या प्राण्यांनाही बसला आहे. पावसामुळे अनेकदा झाडं कोसळून पक्षांची घरटी खाली पडतात आणि त्यानंतर जमिनीवर आसरा शोधतात. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचंही पावसात बरंच नुकसान होतं. प्राण्यांचे घरटे पाण्याच्या प्रवाहात वाहून जातं. त्यामुळे, दाटीवाटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरात सरपटणारे प्राणी आश्रयासाठी जातात. अशाच तब्बल ३३४ सरपटणार्‍या प्राण्यांना सर्प संस्था, रॉ, पॉज आणि डब्लूडब्लूए संस्थाकडून रेस्क्यू करण्यात आले आहे.


हेही वाचा – पाळीव प्राणी विकताय?

- Advertisement -

सरपटणाऱ्या प्राण्यांना मानवीवस्तीतून रेस्क्यू

प्राणीमित्र संस्थांकडून जुलै महिन्यात अहवाल सादर करण्यात आला आहे. यात सर्प संस्थेने २२८ साप, एक प्राणी आणि सहा पक्षी मानवीवस्तीतून रेस्क्यू केले आहेत. तसंच, लोकजागृतीचे दोन कार्यक्रमही संस्थेकडून घेण्यात आले. वाईल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए) संस्थेने ९१ साप, चार प्राणी आणि १५ पक्ष्यांची सुटका केली आहे. त्याप्रमाणेच पॉज (मुंबई) संस्थेकडून २५ साप, तीन कासव आणि ६८ पक्षी रेस्क्यू करण्यात आले आहेत. रॉ संस्थेने मागील महिन्याभरात एकूण १५० पशुपक्ष्यांची सुटका केली. अनेक पशुपक्ष्यांची वैद्यकीय तपासणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. तसेच प्राण्यांची आणि पक्षांची माहिती वनविभागाला
देऊन त्यांना सोडण्यात आले आहे.

प्राण्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या

नागरिकांनी प्राणी पक्षी तसंच सरपटणार्‍या प्राण्यांची माहिती प्राणीमित्र संस्थांना द्या. सर्पांना न मारता ट्रेनिंग घेतलेल्या सर्पमित्राला रेस्क्यूच्या ठिकाणी बोलवा. त्यांच्याजवळ जाऊन सेल्फी घेणे टाळा. त्यांना त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करा. प्राणी पक्षी आणि सरपटणार्‍या प्राण्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या.

- Advertisement -

हेही वाचा – पावसाचा फटका प्राणी-पक्ष्यानांही बसला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -