घरमहाराष्ट्रबदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली; रेल्वे वाहतूक ठप्प

बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली; रेल्वे वाहतूक ठप्प

Subscribe

मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्रा जवळील अनेक भाग पाण्याखाली गेला असून घरांमध्ये आणि इमातींमध्ये पाणी शिरलं आहे. तसंच, उल्हास नदीच्या काठावर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात देखील पाणी गेलं आहे. यामुळे हे केंद्र बंद करण्यात आलं आहे.

उल्हास नदी दुथडी भरून वाहत असून गुरुवारी पहाटे या नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. १७.५० मीटर ही उल्हास नदीची धोक्याची पातळी असून गुरुवारी पहाटे उल्हास नदीने १८ मीटर पाण्याची पातळी गाठली होती. त्यामुळे नदीकाठच्या संकुलामध्ये तळ मजले पाण्याखाली गेले. उल्हास नदीच्या किनार्‍यावर असलेल्या रमेशवाडी हेंद्रे पाडा आणि वालिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी गृह संकुलांमध्ये आले होते. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

- Advertisement -

रेल्वे वाहतूक ठप्प

बदलापूरातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. ट्रॅकवर जवळपास २-३ फूट पाणी साचलं आहे. सिध्देश्वर एक्स्प्रेसही पहाटे पासून बदलापूर रेल्वे स्थानकावर थांवबण्यात आली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -