घरदेश-विदेश'Sexual Material' चा काळाबाजार! चिनी बाजाराने लहान मुलांचे लक्ष घेतले वेधून

‘Sexual Material’ चा काळाबाजार! चिनी बाजाराने लहान मुलांचे लक्ष घेतले वेधून

Subscribe

चीनमध्ये मुलांशी संबंधित लैंगिक सामग्री म्हणजेच ‘Sexual Material’ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जात असल्याचे बघायला मिळते. मात्र त्याला आळा घालण्यासाठी सरकारने योग्य ती कठोर पावले लवकरात लवकर उचलणं आवश्यक आहे. नुकत्याच गेल्या काही दिवसांपूर्वी इंटरनेट रेग्युलेटरीने असे सांगितले की, त्यांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मुलांशी संबंधित लैंगिक सामग्री प्रसारित करण्यासाठी काही कंपन्यांकडून चांगलाच दंड वसूल केला आहे. चीनी बाजारपेठेने मुलांशी संबंधित लैंगिक सामग्री सोशल मीडियासह ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाहीरपणे प्रसारित केल्याने याकडे लहान मुलांचे लक्ष केंद्रीत केले जात आहे. चीनमध्ये मुलांशी संबंधित लैंगिक सामग्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दाखवत असल्याचे चीनमध्ये ‘Sexual Material’ चा काळाबाजार होताना दिसत असून हे पूर्णतः गैर आहे. त्यामुळे यावर योग्य ती कठोर भूमिका घेण्याचे आवाहन देखील केले जात आहे.

चीनी कंपन्यांना मोठा भूर्दंड

यासह अलिबाबाचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ताओबाओ, टेंन्संटची क्यूक्यू मेसेजिंग सर्व्हिस, लाइव्ह स्ट्रीमिंग साइट कुईशौ, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सायना वेइबो आणि सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स सर्व्हिस झीहॉन्गशुमध्ये लैंगिक संकेत दर्शविणार्‍या मुलांचे स्टिकर्स आणि लहान व्हिडिओ आढळले असल्याची माहिती चीनच्या इंटरनेट रेग्युलेटरने दिली. यानंतर या कंपन्यांना मोठा दंड ठोठावण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकारानंतर चीन सरकारकडून कठोर आदेश देण्यात आले असून या समस्येवर वेळीच लक्ष वेधण्यासाठी आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी अशी सामग्री वापरणारी अशी अकाउंट त्वरीत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

सुरक्षेचा आढावा घेतल्यावर केली कारवाई

देशातील आयटी प्लॅटफॉर्मच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर लहान मुलांशी संबंधित अयोग्य सामग्रीवरील ही कारवाई सरकारने केली आहे. रेग्युलेटर चीनी आयटी कंपन्यांच्या प्रतिस्पर्धी आणि डेटासंबंधित विविध बाबींची चौकशी देखील सुरू आहे. यासोबत चीनी सायबर प्लॅटफॉर्म अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने असे सांगितले की, “अल्पवयीन मुलांच्या कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांबद्दल घुसखोरीच्या मुद्दय़ावर कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही.”


डिजिटल प्लॅटफॉर्मवर पॉर्न फिल्म टाकत कुंद्राची लाखोंची कमाई

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -