घरदेश-विदेशउमेश पाल अपहरणप्रकरणात अतिक अहमदसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा

उमेश पाल अपहरणप्रकरणात अतिक अहमदसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा

Subscribe

१७ वर्षे जुन्या उमेल पाल अपहरण प्रकरणात प्रयागराजच्या एमपीएमएल कोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने अतिक अहमदसह तिघांवरील दोष निश्चिती करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अपहरणाच्या या प्रकरणात कोर्टाने अतिकसह हनीफ, दिनेश पासी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. तिघांनाही १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून अतिकचा भाऊ अशरफसह सात जणांचा निर्दोष सोडण्यात आले आहे.

उमेल पाल २००५ मध्ये राजूपाल हत्याकांडप्रकरणात मुख्य साक्षीदार होता. तर, उमेश पाल याची २४ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रयागराजमध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली. याप्रकरणात अतिक, त्याचा भाऊ अशरफ, मुलगा असद यांच्यासह ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. अतिक अहमदला गुजरातच्या साबरमती तुरुंगातून प्रयागराज येथे नेण्यात आले. त्याचा भाऊ अशरफला बरेलीतील प्रयागराज येथे नेण्यात आले. तर, फरहान यालाही तेथेच नेण्यात आले आहे.

- Advertisement -

बसपा आमदार राजू पाल यांची २००५ मध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या खटल्यात उमेश पाल मुख्य साक्षीदार होता. त्यामुळे २८ फेब्रुवारी २००६ रोजी अतिक अहमद आणि अशरफ यांनी उमेश पाल यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्याकडून बळजबरीने प्रतिज्ञापत्र दाखल करून घेण्यात आले. परंतु, २००७ मध्ये मायावतींचे सरकार स्थापन झाल्यानंतर ५ जुलै २००७ मध्ये उमेश पाल यांनी अतिक आणि अशरफ यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला.

या खटल्याची सुनावणी २००९ मध्ये सुरू करण्यात आली. या खटल्यासाठी आठ साक्षीदाराचे जबाब नोंदवण्यात आले. तर, ११ आरोपींपैकी अन्सार बाबा नावाच्या आरोपीचा मृत्यू झाला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -