घरताज्या घडामोडीअशी आहे नाशिक शहरातील पॉझिटिव्ह रूग्णांची हिस्ट्री

अशी आहे नाशिक शहरातील पॉझिटिव्ह रूग्णांची हिस्ट्री

Subscribe

स्पेनवरून आलेल्या तरूणासह तिघे बाधित

नाशिक : मालेगावपाठोपाठ नाशिक शहर करोनाचे हॉटस्पॉट बनले असून, दिवसेंदिवस बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. सोमवारी (दि.८) शहरात पाच नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये देवळाली कॅम्प २, पंचवटी, जेहान सर्कल, शिंगाडा तलाव, पिंपळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ६१३ बाधित रूग्ण असून, एकट्या नाशिक शहरातील एकूण संख्या ४३० वर पोहोचली आहे.

स्पेनवरून आलेला २० वर्षीय तरूण बाधित
सुमंगल प्राईड, जेहान सर्कल येथील २० वर्षीय तरूण स्पेन येथून ३१ मे रोजी नाशिकमध्ये आला. त्याला एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याच्यामध्ये कोणतेही करोनासदृश्य लक्षणे दिसून आली नसली तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा सोमवारी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.

- Advertisement -

जुने नाशकात वृद्धाचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह
जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा येथील ६२ वर्षीय वृद्धामध्ये करोनासदृश्य लक्षणे दिसून आली असता आरोग्य विभागाने त्यांना ५ जून रोजी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचा रविवारी (दि. ७) मृत्यू झाला. तर आजा ते पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

१४ वर्षीय मुलगा बाधित
लोणार गल्ली, रविवार पेठ येथील १४ वर्षीय मुलगा करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याच्यात करोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा आज पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला असून तो रविवार पेठेतील नवीन रूग्ण आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

- Advertisement -

शिंगाडा तलाव येथील वृद्ध बाधित
अभिजीत अपार्टमेंट, गुरुद्वारा रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्धामध्ये करोनासदृश्य लक्षणे दिसून आले असता त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा आज पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रूग्ण -१६१३ (मृत ९९)
नाशिक शहर -४३० (मृत- २१)
मालेगाव -८५० (मृत- ६४)
नाशिक ग्रामीण-२६५ (मृत-९)
अन्य-६४ (मृत-५)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -