घरदेश-विदेशदोन स्वदेशी कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू

दोन स्वदेशी कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू

Subscribe

देशात कोरोनाने थैमान घातले असून बाधितांचा आकडा 9 लाखांवर पोहोचला आहे. मात्र, मृतांची संख्या कमी असल्याने काहीसा ताण कमी झाला आहे. त्यातच एक चांगली बातमी आहे. देशाच्या पहिल्या कोरोना लसीची (COVAXIN) माणसांवर चाचणी करण्यास सुरुवात झाली असून पटन्याच्या एम्समध्ये प्रयोग सुरु आहेत.

कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादची कंपनी भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली आहे. यासाठी पुण्यातील एनआयव्हीने कोरोनाचा स्ट्रेन उपलब्ध करून दिला होता. पटना एम्समध्ये या औषधाच्या चाचणीसाठी हॉस्पिटलने निवडलेल्या 10 जणांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे, असे ऑल इंडिया रेडिओने म्हटले आहे. यानुसार कोरोनाच्या या लसीचा पहिला डोस या रुग्णांना देण्यात आला असून यावर निरीक्षणे नोंदविण्यात येत आहेत. यानंतर 14 दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे.

- Advertisement -

नियोजित वेळापत्रकानुसार या 10 जणांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. लस घेतल्यानंतर त्यांच्यावर होणारे चांगले-वाईट परिणाम पाहिले जाणार आहेत. आयसीएमआरने कोव्हॅक्सिनच्या चाचणीसाठी निवडलेल्या 12 संस्थांपैकी पटनाचे एम्स एक आहे. पटना एम्सचे अधीक्षक डॉ. सीएम सिंग यांनी आधीच वृत्तपत्रांना सांगितले होते की, कोरोनाची लस ही 22 ते 50 वयोगटातील सुदृढ लोकांवरच वापरून पाहिली जाणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुषही असणार आहेत.

भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनी टाईम्स नाऊला सांगितले की, SARS-CoV-2 विषाणूंविरोधात कोव्हॅक्सिन परिणामकारक ठरण्याचा विश्वास आहे. भारत बायोटेक 200 दशलक्ष लसी बनविण्याच्या तयारीला लागली आहे. ही कोव्हॅक्सिन लस हैदराबादच्या जिनोमी व्हॅलीतील प्रकल्पामध्ये बनविण्यात येत आहे. प्राण्यांवर या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -