घरमनोरंजनअभिनेत्री रेखाचा कोरोना चाचणी करण्यास नकार

अभिनेत्री रेखाचा कोरोना चाचणी करण्यास नकार

Subscribe

सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी कोरोना चाचणीला नकार दिला आहे. त्यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षक कोरोनाबाधित आल्यानंतर त्यांच्या बंगल्याच्या परिसरातील अन्य चार बंगल्यांचे सुरक्षारक्षकांनाही बाधा झाली आहे. या सर्वांना मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. हे सुरक्षारक्षक रोज एकमेकांना भेटत होते. यामुळे त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. यामुळे रेखा यांनी कोरोना चाचणी करण्यास नकार देत घरातच क्वारंटाईन केले आहे.

बंगल्यातील सुरक्षारक्षकाला कोरोना झाल्यानंतर रेखा यांच्यासह त्यांची मॅनेजर फरजाना आणि घरातील चार अन्य कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट करायची होती. मात्र, जेव्हा मुंबई महापालिकेतील कर्मचारी रेखा यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजाच उघडण्यात आला नाही. एका न्यूज चॅनेलनुसार महापालिकेच्या टीमने रेखा यांच्या दरवाजाची बेल वाजवली तेव्हा रेखा यांच्या मॅनेजरने येण्याचे कारण विचारले. पालिकेच्या पथकाने कोरोना चाचणी घेण्यासाठी आलो आहोत असे फरजाना यांना सांगितले. तेव्हा फरजाना यांनी आपला नंबर घ्या आणि नंतर बोलू असे सांगितले.

- Advertisement -

यामुळे महापालिकेच्या ‘के-पश्चिम’ वॉर्डचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संजय फगे यांनी फरजाना यांना फोन केला. त्यांनी सांगितले की रेखा या पूर्णपणे बर्‍या आहेत आणि आपले काम चांगल्यारितीने करत आहेत. रेखा या कोणाच्याही संपर्कात आलेल्या नाहीत. यामुळे त्या कोरोनाची चाचणी करू इच्छित नसल्याचे फरजाना यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना सांगितले. यानंतर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी रेखा यांचे घर सॅनिटाईज करण्यासाठी एक नवीन पथक पाठविले होते. त्यांनी घरात जाण्याचा प्रयत्न केला असता यावेळीही दरवाजा उघडण्यात आला नाही. यामुळे पथकाने बंगल्या बाहेरच्या भागाला सॅनिटाईज केले. सुरक्षा रक्षकांचे केबिनही सॅनिटाईज केले आणि मागे फिरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -