घरमहाराष्ट्रआजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या करुन पतीने केली आत्महत्या

आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या करुन पतीने केली आत्महत्या

Subscribe

आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकांने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे.

आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकांने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. अविनाश हेमंत गोरे (६९) आणि वैशाली हेमंत गोरे अशी ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; पुण्याच्या कर्वेनगर येथील गंगा विष्णु संकुल याठिकाणी राहणारे अविनाश गोरे आपल्या पत्नीसह राहत होते. एल आय सीमध्ये स्टेनो ग्राफर म्हणून ते कार्यरत होते. त्यांना एक कन्या असून त्या विवाहित आहेत. त्या सिंहगड रोडला राहायला आहेत. त्यामुळे अविनाश गोरे आणि त्यांची पत्नी दोघेच कर्वेनगरमध्ये राहत होते. वैशाली गोरे यांना वयानुसार अनेक व्याधी झाल्या होत्या. अविनाश गोरे यांनी गेल्याच आठवड्यात मित्रांना आपले गुडघे खूप दुखत असल्याचे सांगितले होते. ते आपल्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी फोनवरुन संपर्कात होते. या आजाराला कंटाळून त्यांनी आपली पत्नी वैशाली हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनेकदा संपर्क करुनही ते फोन उचलत नसल्याने अलंकार पोलिसांनी २७ जुलै रोजी दुपारी याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घरी जाऊन पाहिले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण वाढले, दिवसभरात १,३०८ रुग्णांची नोंद!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -