Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मी डॉक्टरच, छोटी मोठी ऑपरेशन करत असतो; मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदेंची जोरदार...

मी डॉक्टरच, छोटी मोठी ऑपरेशन करत असतो; मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी

Subscribe

मुंबईः मी याआधीच डॉक्टर झालोय. छोटी मोठी ऑपरेशन करतच असतो, अशी जोरदार टोलेबाजी मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत केली. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून मुख्यमंत्री शिंदे यांना डी.लीट पदवी देण्यात आली. पदवी स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात फटकेबाजी केली.

मुख्यमंत्री डॉ. शिंदे म्हणाले, कौटुंबिक जबाबदारीमुळे मी शिक्षण पूर्ण करु शकलो नाही. याची खंत होती. शिक्षण्याची जिद्द होती. तीन वर्षांपूर्वी मी बीएची पदवी घेतली. त्यात चांगले गुण मिळाले. अजूनही पुढे शिकायचे आहे. मधले ऑपरेशन झाले म्हणून शिकायचे राहून गेले.

- Advertisement -

यापूर्वीच मी डॉक्टर झालो आहे. छोटी मोठी ऑपरेशन करतच असतो. नऊ महिन्यापूर्वी जे राज्यात मोठं ऑपरेशन केलं, त्यानंतर जे जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ठरले. जगाच्या विद्यापीठात खूप काही शिकलो आहे. विनम्रता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक माणसाने विनम्र असलेच पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुलगा श्रीकांतचे शिक्षण याच विद्यापीठातून झाले आहे. एमबीबीएस आणि त्यनांतर एमएसचे शिक्षण डी. वाय. पाटील विद्यापीठातूनच श्रीकांतने घेतले आहे. त्याच विद्यापीठातून मला डी. लिट पदवी मिळाली आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या सन्मानासाठी पात्र आहे की नाही माहित नाही. पण सन्मान होत असताना मागच्या गोष्टी आठवायच्या असतात.

लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपल्याकडे संधी, पद आणि जबाबदारी असते तेव्हा आपण घरात बसायचं नसतं. रस्त्यावर उतरून सर्व सामान्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करायची असते. ही शिकवण बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंनी मला दिली. म्हणून महापूर असो किंवा मग करोना काळ, प्रत्येक काळात आमची डॉक्टरांची टीम थेट केरळपर्यंत जाऊन काम करत होती, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला.

हेही वाचाः एकनाथ शिंदे नव्हे…डॉ. एकनाथ शिंदे! मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट पदवी बहाल

 

 

- Advertisment -