घरदेश-विदेशकर्नाटक रणसंग्रामाची आज होणार घोषणा; निवडणूक आयोगाची थोड्याचवेळात पत्रकार परिषद

कर्नाटक रणसंग्रामाची आज होणार घोषणा; निवडणूक आयोगाची थोड्याचवेळात पत्रकार परिषद

Subscribe

Karnataka Election 2023 : नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोग आज सकाळी ११.३० वाजता कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. आज पत्रकार परिषद घेऊन ते तारखा जाहीर करणार आहेत. गेल्यावेळेप्रमाणे यावेळेसही कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपणार आहे.

२०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीत २२४ जागा होत्या. त्यापैकी भाजपाने १०४ जागा बळकावल्या. सर्वांत मोठा पक्ष ठरल्यानंतरही भाजपाला येथे सत्ता स्थापन करण्यास अपयश आलं. जेडीएस आणि काँग्रेसने निवडणुकांच्या निकालानंतर युती केली आणि येथे सत्ता स्थापन केली. परंतु, काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे दिल्याने येथील कुमारस्वामी सरकार कोसळलं. त्यानंतर उरलेल्या आमदारांना आपल्याकडे वळवून भाजपाने बीएस येदियुरप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन केले.

- Advertisement -

कर्नाटकात नेमकं काय घडलं होतं?

मे महिन्यात कर्नाटकात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. अलीकडेच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता.

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुका 12 मे 2018 रोजी झाल्या होत्या. 224 जागांपैकी  222 जागांसाठी मतदान झाले होते, ज्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या JD(S) यांच्यात तिरंगी लढत झाली. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत, भाजप 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु बहुमताच्या आकड्यासाठी 9 जागा कमी पडल्या. बीएस येदियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने काँग्रेस (80 जागा) आणि JD(S) (37 जागा) यांनी युतीची घोषणा केली. याशिवाय प्रत्येकी एक जागा बसपा, कर्नाटक प्रगतीशील जनता पक्ष आणि इतरांच्या खात्यात गेली.

अर्थात काँग्रेस आणि जेडीएसने युतीची घोषणा केली होती पण, राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले. येडियुरप्पा यांनी 17 मे 2018 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

येडियुरप्पा यांनी 19 मे रोजी नाट्यमय पद्धतीने राजीनामा दिला, कारण ते विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले, परंतु बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार पडण्याचा मार्ग मोकळा झाला. नंतर येडियुरप्पा यांनी 26 जुलै 2019 रोजी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नंतर भाजपने येडियुरप्पा यांच्या जागी बोम्मई बसवराज यांना मुख्यमंत्री केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -