घरCORONA UPDATEअतिशहाणपणा केल्यानेच मला झाला कोरोना - जितेंद्र आव्हाड

अतिशहाणपणा केल्यानेच मला झाला कोरोना – जितेंद्र आव्हाड

Subscribe

कोरोनावर मात करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नुकतेच घरी परतले असून, त्यांनी आपण जी चूक केली ती तुम्ही करू नका, असे जनतेला सांगितले.

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली. कोरोनावर मात करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नुकतेच घरी परतले असून, त्यांनी आपण जी चूक केली ती तुम्ही करू नका, असे जनतेला सांगितले. लोकांनी मला मास्क घाला, असे सांगितले होते. पण गर्दीत गेल्यावर मी अनेकदा मास्क नाकावर सरकवून घ्यायचो. हे नियम समाजाने पाळायला हवेत. नियम पाळले असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. एक अद्दल घडवण्यासाठीच कदाचित हे सगळे घडले असावे असे आव्हाड यावेळी म्हणालेत. दरम्यान अतिशहाणपणा करण्याचा माझा स्वभाव आहे. त्याला आता मुरड घालावी लागेल. लोकांमध्ये जाण्याची जी सवय होती त्याचे परिणाम भोगावे लागले, असेही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

आयसीयूत असताना आव्हाडांनी लिहिली चिठ्ठी 

दरम्यान आसयीयूमध्ये असताना आपण चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत आपण सगळी संपत्ती मुलीला दिली जावी, असे लिहिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जेव्हा “मला कोरोना झाला हे  कळलं तेव्हा सर्वात पहिला मुलीचा विचार माझ्या डोक्यात आला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला कोरोना झाला आहे हे माहित नसल्याचे आव्हाड म्हणाले. आयसीयूत असताना जेवणासाठी जे ताट यायचे त्यावर कोरोना रुग्ण लिहिलेले असायचे ते पाहून मला कोरोना झाला असल्याचं कळाल्याचे आव्हाड म्हणालेत. दरम्यान मला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी कोणताही त्रास नव्हता. फक्त अशक्तपणा जाणवत होता. माझी मुलगी मला वारंवार रुग्णालयात जाण्यास सांगत होती. पण मी अतिशहाणपणा करत कशाला रुग्णालयात जायचे म्हणत होतो. ताप, खोकला असला कोणताही त्रास नसल्याने कोरोना झाला आहे. यापासून मी अनभिज्ञ होतो. मी जर तिचे ऐकले असते तर रुग्णालयात दोन तीन दिवसात दाखल होऊन घरी आलो असतो, तसेच हे सगळे भोगावे लागले नसते असे आव्हाड म्हणालेत. दरम्यान रुग्णालयात दाखल केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर असल्याचे सांगण्यात आले. यानंतर फोर्टिज रुग्णलयात हलवण्यात आल्याचे आव्हाड म्हणालेत.

- Advertisement -

हा देश ड्रामा करणाऱ्यांचा, केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या टीकेला आव्हाडांचे उत्तर

कॉंग्रेस नेते राहुल गांधी रस्त्यांवर पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांजवळ जाऊन ड्रामेबाजी करत आहेत, अशी टीका अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केल्यानंतर आता त्यांच्या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामाबाजी असेल, तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे’ असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना लगावला आहे. स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे, त्यांच्याबरोबर चालणे. राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे, असे निर्मला अक्कांचे म्हणणे आहे. जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामाबाजी आहे, तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथे व्यक्त होतेच” असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्थलांतरितांसाठी ट्रेन मागवा, असं काँग्रेस पक्ष त्यांच्या राज्य सरकाराला का बोलले नाही? स्थलांतरित मजुरांचा रस्ता अडवून त्यांच्याशी बातचीत करुन राजकारण करायची ही वेळ आहे का? मग ड्रामेबाज कोण आहे?”, असा सवाल सीतारमन यांनी उपस्थित केला होता. स्थलांतरित मजूर हवालदिल होऊन रस्त्यावर पायी जात असतील तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जा. त्यांना आपल्या गावी सोडण्यासाठी केंद्राकडून ट्रेन मागवा. तुम्ही सांगाल तिथे तीन तासांत रेल्वे दाखल होईल. त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी बातचीत करुन त्यांचा प्रश्न सुटणार नाही. अन्यथा काँग्रेसच्या नेत्यांनी रस्त्यावर चालणाऱ्या मजुरांसोबत चालत जावं, त्यांची सूटकेस पकडावी. हे मला अत्यंत दु:खी होऊन व्यक्त करावे लागत असल्याचे निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या. दरम्यान निर्मला सीतारामन यांच्या या टीकेला काँग्रेसने देखील उत्तर दिले होते.  स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळणं बंद करा. ते मजूर आहेत, मजबूर (लाचार) नाहीत. श्रमिक आणि कामगारांचा अपमान करु नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही. संवेदनहीन सरकारला सर्व मजुरांची माफी मागावी लागेल”, असे कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -