घरमहाराष्ट्र'मी बरा होण्याची शक्यता कमीच होती'; आव्हाडांनी उलगडला कोरोनाविरोधातील लढा

‘मी बरा होण्याची शक्यता कमीच होती’; आव्हाडांनी उलगडला कोरोनाविरोधातील लढा

Subscribe

डॉक्टरांनी मुलीला बोलावून ७० टक्के केस हातातून गेली असल्याचं सांगितलं होतं, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

कोरोनाचा पराभव करुन राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड सुखरुप घरी परतले आहेत. कोरोनाच्या काळातील घटनांचा त्यांनी उलगडा केला आहे. जेव्हा मला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा परिस्थिती हाताबाहेर असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर फोर्टिज रुग्णलयात हलवण्यात आलं. २३ एप्रिल ते २६ एप्रिल हे तीन दिवस खूप कठीण होते. डॉक्टरांनी मुलीला बोलावून ७० टक्के केस हातातून गेली असल्याचं सांगितलं होतं. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा असंही म्हणाले होते. पण नंतर माझ्या प्रकृतीत सुधारण झाली, असा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

शिवाय, आसयीयूमध्ये असताना मी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये माझी सगळी संपत्ती मुलीला दिली जावी असं मी लिहिलं होतं, असं आव्हाडांनी सांगितलं. “मला कोरोना झाल्याची माहिती मिळाली तेव्हा सर्वात पहिला मुलीचा विचार डोक्यात आला. आयसीयूत असताना मी एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत मला काही झालं तर सगळी संपत्ती मुलीच्या नावे करावी असं लिहिलं होतं,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

- Advertisement -

मला कोरोना झाला आहे हे सुरुवातीला माहितीच नव्हतं. आयसीयूत असताना जेवणासाठी जे ताट यायचं त्यावर कोरोना रुग्ण लिहिलेलं पाहून मला कोरोना झाला असल्याचं कळालं. पुढे ते म्हणाले, १० तारखेला डॉक्टरांनी मला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. पण अतिशहाणपणा करण्याचा माझा स्वभाव आहे. त्याला आता मुरड घालावी लागेल. लोकांमध्ये जाण्याच्या सवयीचे परिणाम भोगावे लागले. यासह कोरोना झाल्यापासून ते रुग्णालयात दाखल होईपर्यंतचं मला काहीच आठवत नाही आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.


हेही वाचा – कोरोनावर प्रभावी औषध संयोजन सापडलं; बांग्लादेशी डॉक्टरांचा दावा

- Advertisement -

कोरोनाच्या काळात काळजी घेणं गरजेची आहे. मात्र मी काळजी घेतली नाही. ८० हजार लोकांमध्ये जाऊन जेवण वाटताना, लोकांसाठी काम करताना मी माझ्या तब्बेतीचा विचार केलाच नाही. यामुळे कुटुंबातील लोकांना काय त्रास होईल याचीही कल्पना नव्हती. आजार झाल्यानंतर जेव्हा हे विचार मनात येतात तेव्हा भीती वाटते. आपण काय करुन बसलो आहोत हे असं वाटत राहतं,” असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं. खरतर अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला. लोकांनी वेळोवेळी मला मास्क घाला सांगितलं होतं. गर्दीत गेल्यावर मी अनेकदा मास्क वर नाकावर सरकवून घ्यायचो. हे नियम लोकांनी पाळायला हवेत. जर मी नियम पाळले असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. अद्दल घडवण्यासाठीच कदाचित हे सगळं घडलं असं माझं मत आहे,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -