घरमहाराष्ट्र'माझ्याकडे आणखी 27 फोटो- 5 व्हिडीओ'; संजय राऊतांचा बावनकुळेंवर पुन्हा हल्लाबोल

‘माझ्याकडे आणखी 27 फोटो- 5 व्हिडीओ’; संजय राऊतांचा बावनकुळेंवर पुन्हा हल्लाबोल

Subscribe

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर कथित भाजप नेत्याचा कसिनोतील फोटो ट्वीट केले.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कथित भाजपा नेत्याचा एक फोटो ट्वीट करत महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कसिनोत जुगार खेळत आहेत, असे शीर्षक देत भाजपवर हल्ला चढवला. संजय राऊतांच्या या ट्वीटला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. असे असतानाच पुन्हा एकदा संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत माझ्याकडे आणखी 27 फोटो आणि 5 व्हिडीओ असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तेव्हा पुन्हा एकदा राज्यातील राजकारण कसिनोतील ‘त्या’ कथित फोटो भोवती फिरताना दिसत आहे. (I have 27 more photos  5 videos Sanjay Rauts attack on Bawankulen again)

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर कथित भाजप नेत्याचा कसिनोतील फोटो ट्वीट केले. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे ट्वीट त्यांनी टॅग केले. याला भाजपकडून प्रत्युत्तर मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, मी कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतलेले नाही. त्या फोटोतील व्यक्तीने सांगावे की, तो मी नव्हेच. किंवा त्या पक्षाच्या लोकांनीही सांगावे की ते नाहीत. तेलंगीने एका बारमध्ये एका रात्री एक कोटी रुपये उडवल्याचे मला माहिती होते. पण मकाऊमध्ये महाराष्ट्रातील एक व्यक्ती जाऊन तेथे साडेतीन कोटी रुपये केसिनोमध्ये उडवतो म्हणजे खऱ्या अर्थाने अच्छे दिन आ गये असे वाटते. त्या फोटोतील व्यक्ती म्हणतो की, मी एका रेस्टॉरंटमध्ये बसलोय. पण मला असे वाटते की, तेथे मग आता इडली सांबार दिसते का ते चेक करा, रात्री बारा, साडेबारा वाजता कसिनोमध्ये जातात. सा़डेतीन कोटींचे ते पॉइंट, पोकर्स विकत घेतात. तेसुद्धा तीन टप्प्यात आणि आरामात बसतात. मला कुणाच्या वैयक्तीक आयुष्यावर बोलण्याचा अधिकार नाही पण महाराष्ट्रात काय चाललंय? परिस्थिती काय आहे? सामाजिक वातावरण काय आहे? अशावेळेला आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही ना? आम्ही एखादी गोष्ट समोर आणली म्हणजे समोरच्या ट्रोलधाडीना अजून काही तरी सांगायचं, पण आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या ना आधी. काय तर म्हणे ते कुटुंबासोबत आहेत. ते चिनी कुटुंब आहे. एक्स्टेंडेट फॅमिली चायनिज आहे का? काहीही बोलता असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर पलटवार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘शासन आपल्या दारी ही ‘महानौटंकी’, कार्यक्रमाचे कंत्राट ठाण्यातील एका व्यक्तीलाच का?’

…तर भाजपचे दुकान बंद होईल

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी तर म्हणतो की तुम्ही जेवढे खोटे बोलाल तेवढे फसाल, माझ्याकडे आणखी 27 फोटो आणि पाच व्हिडीओ आहेत. पण आमच्यामध्ये तेवढी माणुसकी शिल्लक आहे. म्हणून सोशल मीडियावर टाकले नाहीत. जर मी ते फोटो आणि व्हिडीओ टाकले तर भारतीय जनता पक्षाला त्यांचे दुकान बंद करावे लागेल. पण मी ते करणार नाही. कारण, 2024 पर्यंत त्यांचं दुकान चालले पाहीजे. फक्त एवढेच दाखवायचे होते की, आम्हीही हात घालू शकतो, तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी सीबीआय असेल परंतू आमच्याकडे मकाऊमध्येसुद्धा ईडी, सीबीआय आहे असाही टोला त्यांना भाजपला लगावला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -