घरताज्या घडामोडीराउतांनी शिंदे गटावर लक्ष ठेवले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती;...

राउतांनी शिंदे गटावर लक्ष ठेवले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती; सामना अग्रलेखावर भुजबळ भडकले

Subscribe

नाशिक : शरद पवार यांनी ’लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे म्हणाले होते, त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. संजय राऊत यांना हे सगळे उकरून काढायची काय गरज आहे? संजय राऊत यांना असे वाटतं का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, मनभेद निर्माण व्हावे? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. मात्र संजय राऊत यांनी इतके लक्ष शिंदे गटावर आणि त्यांच्या बॅगांवर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काहींना काही वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे वातावरण तापलेले दिसून येत आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या ’लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून पहाटेचा शपथविधी आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबात मांडणी करण्यात आली आहे. यावरून आजच्या सामनातून राष्ट्रवादी पक्षावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत लिहतात की शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणार नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते नक्कीच आहेत, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे या अग्रलेखावरून राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यामध्ये बिनसल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान या अग्रलेखाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांना जाब विचारला आहे. महाविकास आघाडीमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यासह अनेक नेते आहेत. ते काम करण्यास समर्थ आहेत. या नेत्यांवर जी जबाबदारी टाकली जाईल, ती समर्थपणे पेलण्याची धमक या नेत्यांमध्ये असल्याचे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले कि, तुमचे जेवढे आयुष्य आहे, तेवढे शरद पवार यांचे राजकारण आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. ते कुणाच्या घरात गेले होते, त्यांना माहित. मात्र संजय राऊत यांनी इतके लक्ष शिंदे गटावर आणि त्यांच्या बॅगांवर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -