घरमहाराष्ट्रनाशिकभारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे उद्या नाशिकमध्ये विसर्जन

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे उद्या नाशिकमध्ये विसर्जन

Subscribe

मंगेशकर कुटुंबिय राहणार उपस्थित , प्रशासनाकडून तयारी सुरू

नाशिक : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन देशातील पवित्र नद्यांमध्ये करण्यात येत आहे. गुरूवारी  नाशिकमध्ये रामकुंड येथे दिदींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्कवर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतीम संस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. ज्यांना अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही त्यांना अस्थिकलशाचे दर्शन घेता येणार आहे. लता दिदींच्या अस्थी गुरूवार सकाळी ८ वाजता रामकुंड येथे विसर्जनासाठी आणण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत आशा भोसले, उषा मंंगेशकर, हदयनाथ मंगेशकर, मिलिंद नार्वेकर व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -