घरAssembly Battle 2022Uttarakhand Election 2022 : भ्रष्टाचाराचे उच्चाटन, दर्जेदार मोफत शिक्षण, रोजगार; उत्तराखंडसाठी 'आप'चा...

Uttarakhand Election 2022 : भ्रष्टाचाराचे उच्चाटन, दर्जेदार मोफत शिक्षण, रोजगार; उत्तराखंडसाठी ‘आप’चा जाहीरनामा

Subscribe

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरु आहे. यानिमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्तराखंडसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अरविंद केजरीवाल सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपच्या जाहीरनाम्यातून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

केजरीवाल यांनी उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आले तर मोफत वीज, रोजगार भत्ता आणि महिलांना प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय आपच्या या जाहीरनाम्यात भ्रष्टाचाराचे उच्चाटन, दर्जेदार मोफत शिक्षण, रोजगार अशा अनेक मोठ्या आश्वासनांचाही समावेश आहे.

- Advertisement -

हरिद्वार येथे पत्रकार परिषद घेत अरविंद केजरीवाल म्हणाले की, उत्तराखंडमध्ये सझ्या मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून त्याचे उच्चाटन करु असे ते म्हणाले आहे. तसेच दिल्लीप्रमाणे उत्तराखंडमध्येही नागरिकांना 24 तास मोफत वीज देऊ, प्रत्येक व्यक्तीला सरकारी नोकरीत समान संधी मिळणार आहे. तसेच जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत पाच हजार रुपये रोजगार भत्ता दिला जाईल. याशिवाय 18 वर्षांवरील महिलांना दरमहिना 1 हजार रुपये दिले जाणार आहे. असे केजरीवाल म्हणाले.

तसेच उत्तराखंडमधील शाळांसाठी काम करून मोडकळीस आलेल्या सरकारी शाळांची दुरुस्ती करु, या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल, तसेच रुग्णालये दुरु करू, गावा-गावात मोहल्ला दवाखाने बनवू, हॉस्पिटल्स तयार करणार, प्रत्येत व्यक्तीवर मोफत उपचार करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

- Advertisement -

याशिवाय राज्यातील रस्ते दुरुस्ती, अयोध्येला येणाऱ्या यात्रेकरुंना सुलभ व्यवस्था, मुस्लीमांना अजमेर शरीफची भेटीची व्यवस्था, शीख आणि खिश्चनांना तीर्थक्षेत्रांच्या भेटीसाठी व्यवस्था करु असे म्हणत उत्तराखंडला आध्यात्मिक राजधानी बनवून पर्यटन क्षेत्राचा विकास करणार असल्याचे आश्वासन केजरीवाल सरकारने दिले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -