घरताज्या घडामोडीलहान मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतोय ; 'ही' आहेत सुरुवातीची लक्षण

लहान मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतोय ; ‘ही’ आहेत सुरुवातीची लक्षण

Subscribe

कॅन्सर हा खूप गंभीर आजार आहे. जर या आजाराची कल्पना वेळेवर आली नाही तर हा आजार अधिक बळावू शकतो. कर्करोग होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत स्तनाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग.

कॅन्सर हा खूप गंभीर आजार आहे. जर या आजाराची कल्पना वेळेवर आली नाही तर हा आजार अधिक बळावू शकतो. कर्करोग होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत स्तनाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग. कॅन्सर हा तरुणांनाच नाही तर लहान मुलांनासुद्धा होत असल्याचे आढळून आले आहे. ब्लड कॅन्सर,मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील ट्यूमर, न्यूरोब्लास्टोमा आणि किडनी कॅन्सर या प्रकारच्या कॅन्सरची प्रकरणे प्रामुख्याने लहान मुलांना होत आहेत.

मोठ्या व्यक्तींपेक्षा लहान मुलांमध्ये कॅन्सरची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तसेच लहान मुलांमध्ये ही कॅन्सरची लक्षणे ओळखणे फार कठीण असते. त्वचा पिवळसर होणे,नाकातून रक्त येणे, हाडं दुखणे,चालण्यासाठी त्रास होणे,सकाळच्या वेळेस उलटी येणे, सतत ताप आणि नरवस, अचानक वजन कमी होणे ही लक्षणे आहेत.काही आजारांमुळे मुलांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता वाढते.उदाहरणार्थ, मुलांमध्ये डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये ल्युकेमिया होण्याची शक्यता 10-20 पट जास्त असते.

- Advertisement -

अनुवांशिकता

कर्करोग हा असा आजार आहे, काहीवेळा तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. जर तुम्हाला कर्करोग असेल, तर तुमच्या मुलाला भविष्यात कर्करोग होण्याची शक्यता असते. रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्यांच्या कर्करोगाचा दुर्मिळ प्रकार आहे. काही मुलांना ते आईच्या पोटातून होते. मुलाला डोळ्यांचा त्रास असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

संसर्गामुळे कॅन्सरचा धोका

काहीवेळा संसर्ग लहान मुलांमध्ये कर्करोगाचा धोका घटक देखील असू शकतो, काही अहवालांनुसार, EVB हा लहान मुलांमध्ये एक सामान्य संसर्ग आहे. त्यामुळे मुलांमध्ये कर्करोग पसरतो.

- Advertisement -

जाणून घ्या उपाय

मुलांना कॅन्सरपासून दूर ठेवण्यासाठी, तुम्हाला विशेषतः स्वतःला आणि मुलाला धूम्रपान किंवा तंबाखूच्या सेवनापासून दूर ठेवावे लागेल. मुलांच्या रोजच्या आहारात भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा, विशेषतः मुलांच्या त्वचेवर. मुलांच्या वजनाकडे विशेष लक्ष द्या.


हे ही वाचा – रायगड -रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, दुरुस्ती केल्यानंतरही झुकला खांब


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -