Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र यंदाचाही उकाडा भारतात कहर करणार -IMD

यंदाचाही उकाडा भारतात कहर करणार -IMD

Related Story

- Advertisement -

मार्च महिना उजाडताच देशभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, कोकणात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच मे २०२१ पर्यंत देशात उष्णतेची लाट अधिक वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला. त्यामुळे २०१५ ते २०२० या वर्षाप्रमाणाचेच २०२१ या वर्षातही भारतातील सर्वात रेकॉर्डब्रेक तापमान नोंदवले जाणार आहे. दरम्यान मार्च महिन्यापासूनच नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तर एप्रिल आणि मे महिनतही नागरिकांना घामाच्या धारा सुटणार आहेत.

त्यामुळे एप्रिल- मे महिन्यात सर्वाधित उष्ण तापमानाचा धोका सहन करावा लागणार आहे. मध्य भारत, उत्तर, पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. तर ओडिशा, झारखंड जिल्ह्यात दिवसा ०.५ सरासरी तापमान राहणार आहे. यात दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, हरियाणा येथेही दिवसा तापमान अधिक उष्ण असणार आहे. तर याची झळ काही प्रमाणात सायंकाळ आणि रात्रीही जाणवण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, कच्छ, राजस्थान, उत्तराखंड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, बिहार या जिल्ह्यातही तापमान वाढणार आहे. तर दक्षिण भारतात म्हणजे तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्रातील काही प्रदेशांत तापमान ०.५ अंशापेक्षा अधिक राहील.

- Advertisement -

नासाने सर्वेक्षणात २०२० जगात सर्वाधिक तापमानाचे वर्षे ठरले. यात जागतिक तापमात यंदा १ अंशाने वाढले आहे. त्यामुळे एकंदरीत पृथ्वीच्या तापमानात भविष्यात २ अंशांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता भारताचे तापमान १.५ अंशाने जरी वाढते तर नागरिकांना तीव्र उष्ण लहरींचा सामना करावा लागेल.

याचदरम्यान महाराष्ट्रातही तापमानाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान 43.8 अंशांवर पोहोचला आहे. या मोसमातील हे सर्वाधित उच्चांक तापमान आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर हे देशातील नाही तर जगातील उच्चंकी तापमान असलेल्या शहरात चौथ्या क्रमांकावर पोहचले आहे. तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले असून लोकांचं जनजीवन प्रभावीत झालं आहे.

- Advertisement -

या तीव्र उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे. तसेच उष्णघातापासून वाचण्यासाठी लिंबू पाणी, ज्यूस, सरबत, तसेच फळांचे सेवन करावे. तसेच उन्हाळ्यात लुज कॉटनचे कपडे शक्यतो वापरा. तसेच हलक्या रंगांचे कपडे घालणे परिधान करावे.


 

- Advertisement -