घरताज्या घडामोडीपूरग्रस्त भागाचे लवकर पंचनामे व्हावे हीच भावना, विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यांवर वडेट्टीवार यांची...

पूरग्रस्त भागाचे लवकर पंचनामे व्हावे हीच भावना, विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यांवर वडेट्टीवार यांची टीका

Subscribe

पंचनामे होण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागल्या पाहिजेत.

राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी दौरे टाळावे असे आवाहन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. नेत्यांच्या दौऱ्याला स्थानिक आधिकारी उपस्थित राहिले तर पंचनामे कोण करतील आणि जर वेळेत पंचनामे झाले नाही तर पुन्हा ओरडायला तयार, पंचनामे झाले नाही, मदतच झाली नाही मात्र पंचनामे होण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागल्या पाहिजेत. ते करु देत नाहीत. यामुळे आशा वेळेस, या संकटाच्या वेळेस स्थानिक प्रशासनाच्या वेळेस संपुर्ण काम करु द्यावे ही सरकारची भावना आहे. विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेले तर त्यांचे ते कामच आहे परंतू इतरांनी जाऊ नये ही सरकारची भूमिका असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

नारायण राणेंना टोला

संकटाच्या काळात स्थानिक प्रशासनाला पंचनामे करु द्यावेत अशी सरकारची भावना असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तर राजकीय नेत्यांच्या दौऱ्याला स्थानिक अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यावर काम लांबत आहेत. यामुळे विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दौरे करु शकतात ते त्यांचे काम आहे. मात्र इतर नेत्यांनी दौरा टाळावा अधिकारी पंचनामे करत आहेत. अशा वेळी नेते जातात आणि म्हणतात स्थानिक अधिकारी उपस्थित नाहीत अमुक नाहीत असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपळूण दौऱ्यावर गेले होते यावेळी अधिकारी उपस्थित राहिले नसल्यामुळे राणेंनी राज्य सरकारवर टीका केली होती.

- Advertisement -

पंचनामे लवकर व्हावे हीच भावना

शासकीय यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुर्ण क्षमतेनं काम करत आहे. तात्काळ पंचनामे केले पाहिजेत, तात्काळ रिपोर्ट आले पाहिजेत ही आमची भूमिका असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. पूरग्रस्तांना मदतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

मुसळधार पावसाची शक्यता

कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती कायम आहे परंतू पावसाचा काही भागात रेड अलर्ट, ऑरेज अलर्ट, यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. संकट येत आहेत पूर ओसरत आहे तर अजूनच येत आहे. यामुळे स्थानिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -