घरताज्या घडामोडीजहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईवर संतापले ओवैसी, म्हणाले या भ्याडपणासाठी मत दिलंय का?

जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईवर संतापले ओवैसी, म्हणाले या भ्याडपणासाठी मत दिलंय का?

Subscribe

दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीनंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या कठोर कारवाई करण्याच्या इशाऱ्यानंतर काही आरोपींवर एनएसए लावण्यात आला आहे. तर त्यांच्या अवैध कामांवर बुलडोझर चालवण्यात येत आहे. दिल्ली सरकारच्या या निर्णयावर एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी चांगलेच संतापले आहेत. हा गरीबांविरोधात करण्यात आलेला हल्ला असल्याचे ओवैसी यांनी म्हटलं आहे. या नागरिकांना कोर्टात दिलासा मागण्यासाठी जाण्याची संधीसुद्धा देण्यात आली नाही. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान केलं आहे.

एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारच्या कारवाईविरोधात उशीरा रात्री ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. भाजपने गरिबांविरोधात युद्ध सुरु केले आहे. अतिक्रमणच्या नावावर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसारखेच दिल्लीमध्ये घरं तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणती नोटीस देण्यात आली नाही. कोर्टात जाण्याची संधीसुद्धा देण्यात आली नाही. फक्त गरीब मुस्लिमांना जिवंत राहण्याची शिक्षा देण्यात येत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

- Advertisement -

असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटलं आहे की, मुख्यंत्री केजरीवाल यांची सरकार पीजब्ल्यूडीही या मोहिमेचा भाग आहे का? जहांगीरपुरीतील लोकांनी विश्वासघात आणि भ्याडपणासाठी मतदान केलं होते का? पोलीस आमच्या पाठीशी नाहीत असे म्हणत राहणं प्रत्येकवेळी चालणार नाही. नैतिकतेचा आणि कायदेशीरपणाचा तुम्ही आव आणत आहात ही स्थिती अत्यंत चिंताजनक आणि निराशाजनक असल्याचे ओवैसी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Jahangirpuri Violence : द्वेषाचे बुलडोझर बंद करा, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -