घरमहाराष्ट्रजालन्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, तरी जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले...

जालन्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, तरी जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले…

Subscribe

जालना : मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे 11 दिवसांपासून उपोषण करत आहेत. सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढण्यात आला, मात्र सुधारीत जीआर काढावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी सरकारला चार दिवसांचा दिलेला अल्टीमेटम उद्या संपणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज रात्री 10.30 वाजता बैठकी बोलावली आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी असणार आहेत. पण या बैठकीआधीच त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. सुधारीत जीआर न आल्यास उद्यापासून पाणीत्याग आणि उपचार बंद असे त्यांनी म्हटले आहे. (Jalanyas delegation will meet the Chief Minister but Jarange Patal warns the government said)

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सुधारीत जीआरसंदर्भात सरकारकडून अद्याप कुठलाही निरोप आलेला नाही. त्यामुळे आमची लढाई सुरू आहे आणि आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. तसेच आम्ही सुधारीत जीआरसंदर्भात सरकारशी चर्चा करायला तयार आहोत. मंत्रालयात जाण्यासाठी आम्ही पिशव्या भरून ठेवल्या आहेत. परंतु अद्यापही सरकारकडून निरोप आलेला नाही. आम्ही 2 पाऊले मागे आलो आहोत. पण माझ्या शब्दावर मी ठाम आहे. त्यामुळे जर सरकारने यापुढेही काही केले नाही तर उद्यापासून पाणी त्याग आणि उपचार बंद होतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आई उपोषणस्थळी आल्यानं जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू; माझ्या बाळाला न्याय द्या, मातेचं आवाहन

मराठा समाजातील तरुणांना जरांगे पाटलांनी केले आवाहन

मराठी समाजातील आंदोलन करणाऱ्या तरुणांना मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले की, राज्यातील मराठा बांधवांनी आंदोलनाला आतापर्यंत ताकदीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला यश येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आंदोलन करताना पाठिंबा वाढवावा, परंतु या आंदोलनाला कुठेही गालबोट लागणार नाही, याचीही काळजी घ्यावी. मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावत आहोत. या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणांना होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही असे काही पाऊस उचलले तर आमच्या या लढ्याचा काहीच उपयोग होणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने शेतात आराम करायला जायला वेळ, पण…; दुष्काळी परिस्थितीवर ठाकरेंचा टोला

आपल्याला न्याय मिळणार 

माझ्यावर विश्वास ठेवा, मराठा आरक्षणासाठी उग्र आंदोलन करू नका. आत्महत्या करू नका. कुणावरही गुन्हे दाखल होणार नाहीत, याची काळजी घ्या. शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करा, अशी विनंती जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांनी म्हटले की, वाशिमसारख्या ठिकाणी आजही बंद आहे. बीडमध्ये चक्का जाम सुरू आहे. परंतु आंदोलन शांततेत व्हायला हवे. जर कुणी तोडफोड करत असेल तर ते आमचे कार्यकर्ते नाहीत, मराठा समाजाचे नाहीत. आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करू नका, आंदोलन लोकशाही मार्गाने करा, असेही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाल केले आहे.

मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार?

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावं यासंदर्भात आज रात्री 10.30 वाजता मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे प्रतिनिधी असणार आहेत. तसेच बैठकीमध्ये सुधारीत जीआरवर चर्चा होणार आहे. त्यामुळे रात्री होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षणावर मार्ग निघणार का? आणि मनोज जरांगे पाटली उपोषण मागे घेणार का? हे पाहावं लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -