घरमहाराष्ट्रJitendra Awhad : 'बात करने से पेहले खुद के गिरेबान मे झांक...

Jitendra Awhad : ‘बात करने से पेहले खुद के गिरेबान मे झांक के देखो’; ‘दादां’च्या गौप्यस्फोटावर आव्हाडांचा पलटवार

Subscribe

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) दोन दिवशीय वैचारिक मंथन शिबिर रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान आज शुक्रवारी समारोपीय भाषणात अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज शुक्रवारी (1 डिसेंबर) रोजी केलेल्या एक ना अनेक गौप्यस्फोटांना आता शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर मिळत आहे. अशातच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा ट्वीट करत अजित पवारांवर नाव न घेता जोरदार हल्ला केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये बात करने से पेहले खुद के गिरेबान मे झाक के देखो अशा ओळी लिहत अजितदादांवर निशाणा साधला आहे. (Jitendra Awhad Baat Karne Se Pehle Khud Ke Gireban Mai Zak Ke Dekho Awhads counter attack on the ajit pawar secret blast)

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) दोन दिवशीय वैचारिक मंथन शिबिर रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान आज शुक्रवारी समारोपीय भाषणात अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले. यामध्ये त्यांनी थेट शरद पवारांच्या भूमिकेबाबतही भाष्य केलं. त्यानंतर शरद पवार गटाकडून त्यांच्या गौप्यस्फोटावर प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जयंत पाटील यांचा समावेश होता. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा त्यांच्या X (पूर्वीचे ट्वीटरवर) पोस्ट लिहत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला केला.

- Advertisement -

हेही वाचा : Analysis : लोकसभेत पवार विरुद्ध पवार लढत रंगणार; बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात कोण लढणार?

काय म्हणाले आव्हाड ट्वीटमध्ये?

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्वीटवरील पोस्टमध्ये लिहिले की, जो स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सख्ख्या काकांचा खड्डा खणत होता. याच काकांचा वारसा हवा होता. त्या काकांना झालेल्या वेदना आणि डोळ्यातले अश्रू उभ्या महाराष्ट्रानी बघितले. जो सख्ख्या चुलत बहिणीचा राजकीय छळ करत होता, तिला संपवण्यासाठी अत्यंत हीन पातळीवर जाऊन बोलत होता, स्मशानातून आवाज येतात ‘माझ्या खुन्याला पकडा’ तू आमचा हिशोब विचारणार? हिशोब लावून निष्ठा बदलत नाही मी, ज्यांनी दिला आसरा त्याचे घर जाळत नाही मी.
लक्ष्यात आहे ना? बात करने से पेहले खुद के गिरेबान में झांक के देखो असे लिहित जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांच्या या ट्वीटवरील पोस्टनंतर अजित पवार गटाकडून कसे उत्तर मिळते हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : MLA DISQUALIFICATION : एकनाथ शिंदेंच्या ई-मेलवरून खडाजंगी; दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद

भगीरथ बियाणींच्या आत्महत्ये मागे कोण?

अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये लिहिले की, आणि हो, भगीरथ बियाणींनी आत्महत्या का आणि कुणामुळे केली ? असा प्रश्न उपस्थित करत बीडमधील प्रकरण पुन्हा एकदा पुढे काढले आहे. तर पोस्टच्या शेवटी बोलता तुम्हाला येते तर मुका मी पण नाही, माझ्या मागे काकाची पुण्याई नाही, तर गाळलेल्या घामाची ताकत आहे असे लिहित पोस्ट संपवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -