घरमहाराष्ट्रशिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी कर्नाटकच्या सीएमनी माफी मागावी, आदित्य ठाकरे आक्रमक

शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी कर्नाटकच्या सीएमनी माफी मागावी, आदित्य ठाकरे आक्रमक

Subscribe

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडीओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला होता. विटंबना केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती.

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, अशा धक्कादायक विधानानंतर कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) वादात सापडले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनीसुद्धा कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर हल्लाबोल केलाय.

आदित्य ठाकरेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे यासंदर्भात प्रतिक्रिया दिलीय. कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, त्याला छोटी घटना असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. तिथे फार जो घाणेरडा प्रकार होत आहे, त्याचा विरोध तर करायचा आहेच, त्याचा विरोध तर होतच आहे. पण यात कुठे ना कुठे तरी केंद्रानं दखल घेणं गरजेचं आहे. कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही हे दाखवणं गरजेचं आहे. कुठल्याही भाषकाच्या नागरिकावर अन्याय होणार नाही हे दाखवणं गरजेचं आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.

- Advertisement -

मराठी भाषकांवर जो अन्याय होत आहे. परवा आपण बघितलं की महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. या सगळ्याच गोष्टी एकदम घृणास्पद आहेत. या गोष्टी राग येण्यासारख्या आहेत. महाराष्ट्र शांत आणि संयमी आहे, पण यात केंद्रानं दखल घेऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ती छोटी गोष्ट आहे म्हटलं होतं. त्यांनी स्वतःहून जाऊन अभिषेक करून माफी मागणं हे आता योग्य ठरेल, असंही त्यांनी सांगितलंय.

ते वादग्रस्त विधान नेमकं काय होतं?

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडीओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला होता. विटंबना केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती. बंगळुरुतील एक चौकातील हा पुतळा असून, त्याची गुरुवारी रात्री विटंबना करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या घटनेचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर ही घटना समोर आली आणि चौफेर या घटनेबाबत तीव्र पडसाद उमटू लागले. महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे रातोरात केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -