घरताज्या घडामोडीह्रतिकसोबत घटस्फोटानंतर पत्नी सुझॅन खान अरसलान गोनीच्या प्रेमात

ह्रतिकसोबत घटस्फोटानंतर पत्नी सुझॅन खान अरसलान गोनीच्या प्रेमात

Subscribe

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनचा पत्नी सुझॅन खानसोबत काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. ह्रतिक सोबतच्या घटस्फोटानंतर सुझॅनचे नाव अनेक जणांसोबत जोडण्यात आले होते.मात्र आता सुझॅनच्या नव्या रिलेशनबद्दल खुलासा झालाय. ह्रतिकसोबतच्या घटस्फोटानंतर सुझॅन अभिनेता अरसलान गोनीच्या प्रेमात पडली आहे. सुझॅनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. नुकताच अरसलान गोनीचा वाढदिवस झाला. याच निमित्ताने सुझॅनने दोघांच्या नात्याविषयी घोषणा केली. दोघांना अनेक दिवसांपासून अनेक पार्टांमध्ये हॅगआऊट करताना स्पॉट करण्यात आले होते.

हॅपी हॅपी हॅपीएस्ट बर्थडे. मी तुझ्यासाठी असे जग मागते जिथे तु ज्या गोष्टींसाठी पात्र आहेस त्या सगळ्या गोष्टी तुला मिळतील. तुझ्या भोवती सगळी सुख आणि खरे प्रेम असूदेत. तुला जगातील सर्वात सुंदर गोष्टी मिळो, अशा शुभेच्छा देत सुझॅनने दोघांचा फोटो पोस्ट केला. या फोटोवरुन सुझॅन अरसलाम गोनीच्या प्रेमात असल्याचे समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

- Advertisement -

 

- Advertisement -

अरसलान गोनीने देखील सुझॅनची पोस्ट शेअर करत त्यावर हार्ट इमोजी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी सुझॅनचा देखील वाढदिवस झाला त्यावेळी देखील अरसलानने सुझॅनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटले होते, तुझ्यासारखी चांगल्या आणि स्वच्छ मनाची मुलगी मला आजपर्यंत मिळाली नाही. सध्या दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत एकमेकांचे कौतुक करत असतात. दोघांच्या पोस्टवरुन दोघेही एकमेकांच्या आकांत प्रेमात बुडालेत हे दिसून येते.

अरसलानने मात्र एका मुलाखतीत म्हटले होते, मी आणि सुझॅन फक्त चांगले मित्र आहोत. आमच्या एका कॉमन मित्राच्या घरी आमची ओळख झाली. तिथे आमची मैत्री आणि पुढे आमच्यातल ट्युनिंग देखील वाढले. सुझॅन फार चांगली व्यक्ती आहे.


हेही वाचा – जेव्हा आईशी खोट बोलून लोकलने फिरायला गेली होती सारा अली खान, सांगितला मजेशीर किस्सा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -