घरमहाराष्ट्रकाशीद समुद्रात दोघे बुडाले

काशीद समुद्रात दोघे बुडाले

Subscribe

तरुण-तरुणीचा मृत्यू

फिरण्यासाठी आलेल्या तरुणासह तरुणीचा मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता घडली. अभिषेक विवेक म्हात्रे (32), पूजा अशोक शेट्टी (28) व रोहिणी कृष्णा कातारे (28) (सर्व राहणार नावडे, ता. पनवेल) हे तिघेजण सायंकाळी ५.30 च्या सुमारास क्विड कारने (एमएच 46 एपी 7692) पनवेलहून काशीदला आले. त्यानंतर अभिषेक व पूजा पाण्यात उतरले, तर रोहिणी किनार्‍यावर थांबली. मात्र त्याचवेळी ओहटीची वेळ असल्याने अभिषेक व पूजा पाण्यात खेचले गेले. तेव्हा ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत अभिषेकला बाहेर काढले. त्यावेळी तो बेशुद्धावस्थेत असल्याने त्याला तातडीने बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री जगताप यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

पूजा बेपत्ता झाल्याने ग्रामस्थांसह मुरुड पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. रात्री 8.30 च्या दरम्यान तिचा मृतदेह दुर्घटना घडली त्या परिसरात सापडला. या घटनेनंतर नायब तहसीलदार रवींद्र सानप व तलाठी किरण जुईकर यांनी बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली. या घटनेचे वृत्त मृतांच्या नातेवाईकांना कळविण्यात आल्यानंतर ते इकडे येण्यास निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर पर्यटकांच्या आततायीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -