घरमहाराष्ट्रकिल्लारी भूकंप : पुनर्वसनासाठी मनमोहनसिंगांनी दहा दिवसांत दिले कोट्यवधी रुपये- शरद पवार

किल्लारी भूकंप : पुनर्वसनासाठी मनमोहनसिंगांनी दहा दिवसांत दिले कोट्यवधी रुपये- शरद पवार

Subscribe

लातूर : किल्लारी भूकंपला आज 30 वर्ष पूर्ण झाले आहे. 30 सप्टेंबर 1993 ला लातूरच्या किल्लारी येथे भूकंप झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री होते. तेव्हा शरद पवार, राज्यातील कॅलेक्टर, केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग आणि जनतेने कशा पद्धतीने या संकटला तोंड दिले आणि यातून भूकंपग्रस्ताचे पुर्नवसन केले. यावेळी शरद पवारांनी भूकंपात मृत्यू पावलेल्यांना शरद पवारांनी श्रद्धांजली वाहिली. किल्लारी भूकंपाला आज 30 वर्षं पूर्ण झाली.

यावेळी शरद पवार म्हणाले, “राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जो असतो, त्याच्याकडे अनेक जबाबदारी असतात. त्यापैकी एक जबाबदारी जी असते. गणपती विसर्जना दिवशी शेवटचा गणपतीचे गेल्याशिवाय त्याला विश्रांती घेता येत नाही. त्या ती 30 तारखेला जिल्ह्या जिल्ह्याचा कॅलेटरला विचारले की, गणपती विसर्जनसंदर्भात माहिती घेतली. यानंतर मी झोपण्यासाठी गेलो. तेव्हा मी माझ्या घराच्या खिडक्या हलल्या, घरातील सामान हल्ले, मग माझ्या लक्षात आले की हे भूकंपाशिवाय शक्य नाही. आणि भूकंप म्हटले की, कोयनेचे नाव आठवितो. तेव्हा खूप नुकसान देखील झाले होते. यानंतर कोयनेत भूकंपाची माहिती देणारे केंद्र राज्या सरकारने स्थापन केले. तेव्हा मी फोन करून विचारले की, भूकंप झाला, यांची माहिती तुमच्याकडे आहे. तेव्हा ती त्यांनी सांगितले की, इथे भूकंप झाला नाही. मग मी विचारले की कुठे भूकंप झाला. तेव्हा ते म्हटले की मी माहिती घेऊ सांगतो, असे म्हटले. यानंतर सखोल माहिती घेतली आणि सांगितले की, लातूरमधील किल्लारी येथे भूकंप झाला आहे.

- Advertisement -

“मी अधिकाऱ्यांना उठविले, विलासराव देशमुख आणि पद्मसिंह पाटील  या दोघांशी संपर्क करा आणि मुख्य सचिवा सांगात की, सकाळी आम्हाला विमान पाहिजे. गावात जाता भयानक परिस्थिती घरे पडली, प्रत पडली, कोणी रडत आहे. आयुष्यात असे संकट कधी पाहूने, अशी स्थिती या किल्लाने पाहिले. आजूबाजूला बघत बघत मी फिरत होतो. लक्षात आले की एकटे किल्लारी नाही, औसा तालुका असेल, उमरगाव तालुका असेल आजूबाजूला प्रचंड नुकसान झाले. हे मानवी संकट नसून निर्सगाची अवकृपा आहे. यासंकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारची सत्ता आणि शक्ती या संकटग्रस्त माणसाच्या मागे उभी केल्याशिवाय आपण यांचे पुर्नवसन करू शकत नाही. त्या दिवशी आजूबाजूच्या जिल्ह्यातील अधिकारी बोलवून घेतले. डॉक्टर बोलविले आणि अन्य सुविधा कसे देता येईल, हे पाहिले. जवळपासून तीन आठवडे या कामाशिवाय दुसरे काही काम केले नाही. मी १५ दिवस किल्ला येथे येऊ राहिले, तेव्हा दरोरोज येथे सकाळी काम करून संध्याकाळी झोपायला जायाचो आणि पुन्हा सकाळी कामासाठी येत होते, असा कार्यक्रम आखला. मला एका गोष्टीचे समाधान आहे की, एवढे मोठे संकट आले असताना लातूर आणि किल्लारी येथील लोकांनी मोठ्या धौर्याने तोंड दिले. यावेळी ऐतिसहासिक काम केले” असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – ‘वाघनखं भाडेतत्वावर आणणार की कायमसाठी’, आदित्य ठाकरेंचा सरकारला बोचरा सवाल

- Advertisement -

शरद पवारांनी सांगितली कलेक्टरची आठवण

शरद पवार म्हणाले, “सुदैवाने विलासराव देशमुख आणि पद्मसिंह पाटील यांच्यासारखे सहकारी होते. या जबाबदारी दिली आणि बाकीच्या अधिकारी त्यांना सात दिली. त्या काळा आम्ही भूकंपग्रस्त लोकांना आधार देण्याचे काम केले. कलेक्टर आणि सर्व अधिकाऱ्यांनी काम केले. अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल सांगताना शरद पवार म्हणाले, प्रविण परदेशी नावाचे कलेक्टर होते.  मी रस्त्यातून जात असतान एक माणूस बैलगाडीत झोपला होता. मी त्याला उठविले तेव्हा माझ्या लक्षात आले की, हा तुमचा कॅलेक्टर होता. दिवसभर काम करून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी बैलगाडी झोपला होता.”

हेही वाचा – Lok Sabha Election : लोकसभेसाठी भाजपची नवी खेळी, मोठ्या नेत्यांना देणार उमेदवारी?

मनमोहन सिंगांनी अवघ्या 10 दिवसांत दिले कोट्यावधी रुपये

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राचे वैशिष्ट्ये हे आहे की, संकटावर मात करण्याची ताकत महाराष्ट्राच्या प्रशासन नियंत्रणेत आहेत आणि त्याचे उत्तम उदाहरण हे आज बघायला मिळाले. संकट येतात त्याला धौर्याने तोंड द्याचे असते. हे संकट आले आणि तुम्ही आम्ही सर्वांनी कष्ट केले. याचा परिणाम संपूर्ण जगात याची चर्चा झाली. मला यूनो आणि जागतिक बँकेत बोलविले. मला सांगितले की, लातूरच्या भूकंपला तुमच्या यंत्रणेने आणि लोकांनी कसे दिले. यासंबंधिचे तुमचे विचार आम्हाला सांगा. याचा आधखी एक फायदा झाला की, या भूकंपाला कोट्यावधी रुपये लागणार होते. त्यावेळी राज्य सरकारकडे ऐवढी रक्कम नव्हती. सुदैवाने तेव्हाचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितले की, पवार साहेब तुम्ही पैशाची काळजी करू नका. तुम्हाला जेवढी रक्कम पाहिजे. तेव्ही रक्कम देऊ, मी जागतिक बँकेकडे बोलून तुम्हाला जेवढी पैसे पाहिजे. ती रक्कम मी उपलब्ध करू देईन. भूकंपग्रस्तांचे पुर्नवसर करण्यासाठी लागेली कोट्यावधी रुपयाची रक्कम अवघ्या १० दिवसा दिली. जागतिक बँकेच्या आता उपलब्ध करून दिली. देशाचे पंतप्रधान तीन दिवसांत येणार होते मी सांगितले. यायचे नाही कारण ते आले तर सगळे अधिकारी त्यात अडकतील आणि जखमी लोकांकडे दुर्लक्ष होईल. त्यांनी ऐकले आणि ते आले नाहीत.”

हेही वाचा – दोन दादांच्या वादामुळे पुण्यात निधी वाटपाचा तिढा; विकासही रखडला

“या भूकंपात अनेक कुटुंबातील प्रमुख माणसे गेली होती त्यावेळी शांतीलाल मुथा यांच्यावर एक जबाबदरी दिली.  त्यांनी पुण्यात एक इमारत बांधून त्याठिकाणी येथील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. घरचे पालक नसले तरी शांतीलाल मुथा हे त्यांचे पालक झाले. पण हे संस्कार यशवंतराव चव्हाण यांची आहे”, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -