घरमहाराष्ट्र'वाघनखं भाडेतत्वावर आणणार की कायमसाठी', आदित्य ठाकरेंचा सरकारला बोचरा सवाल

‘वाघनखं भाडेतत्वावर आणणार की कायमसाठी’, आदित्य ठाकरेंचा सरकारला बोचरा सवाल

Subscribe

मुंबई : वाघनखे कायमस्वरुपी  इथे राहणार का? किंवा भाडेतत्वावर येणार, यासंदर्भात राज्य सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाखनखे ही तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारताला देण्यास व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने संमती दिली आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले असून यावेळी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

वाघनखेसंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “वाघनखे ही परत येणार हे आम्हाला सांगितले होते. यावर राज्य सरकारकडून मला थोडे स्पष्टीकरण पाहिजे. छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत. भावनांशी खेळ कुठेही नको. म्हणून दोन तीन प्रश्न विचार आहे की, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट यांच्या वेबसाईटवर तुम्ही पाहाल, तर असे सांगितले गेले की,ब्रिटिश इतिहासकारांच्या संग्रहातील आहे. पण राज्य सरकारचा दावा आहे की, ही वाघनखे महाराजांची आहे. पण व्हिक्टोरिया अँड अल्बर्टच्या वेबसाईटवर लिहिले की, वाघनखे ही महाराजांनी वापरलेली आहे का? यासंदर्भात पडताळी केल्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारनी ब्रिटिनमधून आणण्यात येणारी वाघनखे ही खरेच महाराजांनीवापरलेली आहे का? यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे. यात भावनांचा खेळ नको. जर ही वाघनखे खरोखर महाराजांनी वापरली असेल तर आमची मागणी आहे की, ती वाघनखे भारतात आलीच पाहिजेत.”

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचाही परदेश दौरा रद्द; ठाकरे गटाची खेळी यशस्वी

वाघनखे शिवकालीन आहे की…

“ही वाघनखे परतावा आहेत की, भाडेतत्वावर घेऊन येणार आहेत. कारण जो जीआर निघाला आहे. ही वाघनखे जनमानसाच्या दर्शनाकरिता तीन वर्षासाठी कालावधीसाठी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने मान्य केले आहे. मग ही वाघनखे कर्जावर आहे की, परतावा आहे. जर परतावा असेल, तर महाराजांचे मंदिर बांधावे आणि त्यात ही वाघनखे ठेवली जावी. पण वाघनखे शिवकालीन आहे की, ती महाराजांनी वापरलेली आहेत का? यासंदर्भात राज्य सरकारकडून स्पष्टीकरण यावे, आणि दुसरे म्हणजे हे कर्जावर घेतले की परतावा आहे. जर परतावा असेल, तर चांगले आहे सर्व मंत्रीमंडळांनी त्यांचे स्वागत करावे. आम्ही सर्वजण वाजत गाजत स्वागत करू. राज्यातील लोकांशी खोटे बोलणे योग्य नाही. यामुळे राज्य सरकारने या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -