घरताज्या घडामोडीINS Vikrant : नील सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला, सोमय्या पिता-पुत्रांना मोठा झटका

INS Vikrant : नील सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला, सोमय्या पिता-पुत्रांना मोठा झटका

Subscribe

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता नील सोमय्या यांचासुद्धा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी जमा केलेल्या पैशाचा अपहार केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या आणि पुत्र नील सोमय्या यांच्यावर करण्यात आला आहे. सोमवारी किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. तर नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. अखेर मंगळवारी सुनावणीदरम्यान नील सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यामुळे सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना समन्स जारी केले आहे.

आयएनएस विक्रांत प्रकरणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जमा केलेला पैसा स्वतःच्या निवडणुकीसाठी आणि मुलगा नील सोमय्याच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत खर्च केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी सैनिक भोसले यांनी मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. परंतु दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या शोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी मंगळवारी त्यांच्या मुंबईतील कार्यालयात पोहोचले. आयएनएस विक्रांतच्या दुरुस्तीसाठी जमा केलेल्या देणग्यांमधील कथित घोटाळ्याप्रकरणी पोलीस किरीट सोमय्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी न्यायालयाने सोमवारी किरीट सोमय्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता.

किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाला समन्स

महाराष्ट्र गृह विभागाच्या म्हणण्यानुसार, भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा कोणताही पत्ता नाही. आता त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ३ सदस्यीय पथकाने आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयासह अन्य ठिकाणी झडती घेतली.

- Advertisement -

हेही वाचा : ‘INS विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी भाजपाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदाराची चौकशी करा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -