घरमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या घरी ईडीचे पथक दाखल, पत्राचाळ प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता

संजय राऊतांच्या घरी ईडीचे पथक दाखल, पत्राचाळ प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता

Subscribe

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले असून पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे अधिकारी आज सकाळीच राऊतांच्या घरी पोहोचले आहेत. राऊत यांच्या घराबाहेर CISF चा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ देण्याची विनंती त्यानी केली होती.

अनेक दिवसांपासू संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावणअयात आले होते. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. यानंतर आज सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले. संजय राऊत सद्या त्यांच्या कुटुंबियांसोबत घरी आहेत.अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने दोनदा संजय राऊत यांना समन्स बाजवले होते. त्यावेळी मी कोणाला घाबरत नाही असे त्यांनी सांगितले होते. केंद्राच्या सांगण्यावरून आमच्यावर टीका केली जात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

- Advertisement -

अपील फेटाळत 27 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स –

20 जुलै रोजी, ईडीने संजय राऊत यांना मुंबईच्या उपनगरातील चाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. संसदेच्या अधिवेशनाचे कारण देत त्यांनी पुढची तारिख मागितली होती. त्यानंतर राऊत यांच्या वकिलाने बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात जाऊन 7 ऑगस्टपर्यंत सूट मागितली होती. मात्र, त्यांचे अपील फेटाळण्यात आले होते. त्यानंतर आता ईडीने नवीन समन्स जारी करून राऊत यांना 27 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -