घरमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा; चाकरमान्यांची कोकण रेल्वेवर झुंबड

गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा; चाकरमान्यांची कोकण रेल्वेवर झुंबड

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोना निर्बंध असतानाही कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मात्र, घोषणा करताच आरक्षणासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली. काही गाड्यांची प्रतिक्षा यादी देखील फूल झाली आहे. कोकण रेल्वेने घोषित केलेल्या ७२ विशेष गाड्या ५ सप्टेंबरपासून सोडण्यात येणार आहेत.

येत्या १० सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य आणि कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली. दरम्यान, या गाड्यांच्या आरक्षणासाठी सुरुवात झाली आहे. तथापि, आरक्षण सुरू होताच काही गाड्यांसाठी प्रतीक्षा यादीही लागली आहे. गेल्या वर्षी कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्ताने १८४ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. परंतु, त्यावेळी १४ दिवस क्वारंटाईन व्हावं लागत असल्यामुळे अनेक चाकरमान्यांनी आठ ते दहा दिवस आधीच खासगी वाहनांनी कोकण गाठलं होतं. त्यामुळे कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या वर्षी कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली असून त्याच्या आरक्षणाला ८ जुलैपासून सुरुवात झाली.

- Advertisement -

या गाड्यांची प्रतिक्षा यादी ३०० च्या वर

५ सप्टेंबरपासून गाडी क्रमांक ०१२२७- ‘सीएसएमटी ते सावंतवाडी’ दररोज धावणार आहे. या गाडीच्या स्लीपर क्लासची ५ सप्टेंबरला ८१, तर ७ सप्टेंबरला ३६३ आणि ९ सप्टेंबरला ३९९ अशी प्रतिक्षा यादी आहे. तर आसन श्रेणीसाठी ७ सप्टेंबरला २६० एवढी प्रतीक्षा यादी असून ८ आणि ९ सप्टेंबरला तिकीटच उपलब्ध नसल्याचं दाखवलं जात आहे.

गाडी क्रमांक ०१२३१- ‘पनवेल ते सावंतवाडी’ आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ही गाडी ७ सप्टेंबरपासून धावणार आहे. या गाडीची आसन श्रेणीतील प्रतीक्षा यादी १८६ आणि ८ सप्टेंबरच्या गाडीची प्रतीक्षा यादी ३००च्या वर गेली आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -