घरमहाराष्ट्रकोल्हापूर भीषण अपघात: मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, 7 वाहनांचे नुकसान

कोल्हापूर भीषण अपघात: मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, 7 वाहनांचे नुकसान

Subscribe

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने सात वाहनांना धडक दिल्ययाने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. ही घटना कोल्हापुरातील कसबा बावडा ते सीपीआर चौककडे जाणाऱ्या रोडवरील महावीर कॉलजे समोर बुधवारी (18 ऑक्टोबर) दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर जमावाने मद्यधुंद चालकाला बेदम मारहाण केली.

या कार चालकाचे नाव ऋषिकेश बाबुराव कोतेकर (वय 29)ने मद्यधुंद कसबा बावडा येथून सीपीआर रुग्णालयाच्या दिशेने येत असताना त्यांने भरधाव वेगाने रमणमळा ते मेरी वेदर मैदानादरम्यान दोन दुचाकींना धडक दिली. यानंतर ही कार चालक न थांबता वेगाने महावीर कॉलेज चौकात आला.

- Advertisement -

हेही वाचा – Sunil Kawale Suicide : सरकारमुळेच बळी जातायेत; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

यावेळी बॅडमिंटन खेळून वरुण रवी कोरडे (वय 22) खेळाडू हा त्यांच्या दुचाकीवरून घरच्या दिशेने येत होता. त्यावेळी ऋषिकेश कोतेकर यांच्या कारच्या धकडेत वरुण रस्त्यावर कोसळला आणि त्याच जागी त्याचा मृत्यू झाला आहे. या धडकेनंतर कार चालकाचे त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि कार विरुद्ध दिशेने येत असल्याचे दोन कार आणि पाच दुचाकींना चिरडले. यासंपूर्ण प्रकार रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडला. या घटनेत सात वाहनाना कारने धडक दिल्याने रस्त्यावर काचांचा सडा पडला होता. यावेळी घटनास्थळी नागरिकांच्या गर्दीने ऋषिकेश कोतेकर याला गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -