घरताज्या घडामोडीपंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद

पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद

Subscribe

राज्यभरात आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापुरलाही या पावसाचा फटका बसला आहे. कोल्हापूरमधील पंचगंगेच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

राज्यभरात आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापुरलाही या पावसाचा फटका बसला आहे. कोल्हापूरमधील पंचगंगेच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी कोल्हापूरमधून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (Kolhapur to konkan rout closed for transport due to panchganga rever overflow)

कोल्हापूरमधून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद

- Advertisement -

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कोल्हापूरमधून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, कोल्हापूरमध्येही पावसाची संततधार कायम आहे.

पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट

- Advertisement -

दरम्यान, पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट इतकी आहे. मात्र सध्या पाणी ४० फुटांवरून वाहत आहे. शिवाय, राधानगरी धरण 100 टक्के भरले असल्याने 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भोगावती नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. परिणामी नादीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, अनेक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे मार्ग वाहतुकीसाठी बंद

  • गगनबावडा घाटमार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद
  • लोंगे-किरवे इथं नदीचं पाणी रस्त्यावर आल्याने मार्ग बंद
  • कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ रस्त्यावर पाणी आल्यानं हा मार्ग बंद
  • कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 5 राज्यमार्ग आणि 21 जिल्हा मार्ग बंद

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असल्यानं शिवाजी विद्यापीठाने दोन दिवसातील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षांची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु

अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तसेच सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी 24 फुटांवर गेली आहे. शिवाय, कोयना धरणातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरण भरल्यानंतर कृष्णेत विसर्ग सुरु होईल. त्यामुळे अलमट्टीमधील पाण्याची आवक आणि विसर्ग यामध्ये समन्वय ठेवल्यास ठेवल्यास निश्चित पुराचा धोका कमी होण्यास मदत होईल.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेत द्वंद्व, म्हणून सेना फुटली; आशिष शेलारांची टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -