घरक्राइमLalit Patil Arrested : "मी पळालो नाही, मला..." ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा...

Lalit Patil Arrested : “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट

Subscribe

"मी लवकरच पत्रकारांशी बोलेन. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही. मला पळवले गेले." असा गौप्यस्फोट ड्रग्ज माफिया ललित पाटील याने केला आहे.

मुंबई : “मी लवकरच पत्रकारांशी बोलेन. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही. मला पळवले गेले.” असा गौप्यस्फोट ड्रग्ज माफिया ललित पाटील याने केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने पोलिसांनी अटक केलेल्या ललितसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कॅमेऱ्यासमोर ललितने ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता ललित पाटीलच्या फरार होण्याच्या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे? तसेच ललितला नेमके काय सांगायचे आहे, असा प्रश्न निमित्ताने उपस्थित होत आहे. (Lalit Patil Arrested : “I didn’t run away,” Drug mafia Lalit Patil’s secret blast)

हेही वाचा – मोठी बातमी: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर अटक

- Advertisement -

पुण्यातील ससून रुग्णालयातून पळ काढून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी मोठ्या शिताफीने दक्षिण भारतातील चेन्नई येथे लपून बसलेल्या ललित पाटीलला अटक केली आहे. त्याच्या शोधासाठी दहा पथके तयार करण्यात आली होती. अखेर काल 17 ऑक्टोबरला, मंगळवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ललित पाटीललला मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याचे तपासणी करण्याकरिता त्याला रुग्णालयात नेण्यात येत असताना एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ललितशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने मी लवकरच पत्रकारांशी बोलेन, असे सांगितले.

यानंतर रुग्णालयात नेण्यात आलेल्या ललितसमोर कॅमेरा नेला असता, त्याने पुन्हा “मी ससून रुग्णालयातून पळालो नाही. मला पळवले गेले. कोणाकोणाचा हात आहे, हे सर्व सांगेन,” असे सांगितले. ज्यामुळे आता ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्ज प्रकरणातील अनेक बड्या माफियांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. तर ललितला नेमके कोणी पळवले होते. यामध्ये नेमके कोणाचा हात आहे, असा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. ललित पाटील याला जर का माध्यमांसमोर बोलण्याची संधी देण्यात आली तर तो त्याच्या फरार होण्यात नेमका कोणाचा हात आहे, हेही सांगण्याची शक्यता आहे. परंतु ललित हा ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने पोलिसांकडून सर्वच बाबतीत मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु, या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा मात्र फरार झाला होता. पोलिसांच्या हातावर तुरी देत ललित फरार झाल्याने पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढले जात होते.

ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. येथे 9 महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. पोलिसांनी चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथे ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचे समोर आले. ज्यानंतर पोलिसांनी भूषण पाटील याला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -