घरदेश-विदेशकेंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट; बोनस जाहीर, जाणून घ्या सविस्तर

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट; बोनस जाहीर, जाणून घ्या सविस्तर

Subscribe

केंद्रातील कर्मचाऱ्यांना नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (अॅडहॉक बोनस) दिला जातो. याअंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप बी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: Central Government Employees news: केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला आहे. याला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या आहेत. केंद्रातील कर्मचाऱ्यांना नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (अॅडहॉक बोनस) दिला जातो. याअंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप बी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे. (Modi government s Diwali gift to central employees Bonus announced know in detail)

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस?

ग्रुप बी आणि ग्रुप सी गटात मोडणाऱ्या केंद्र सरकारच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जातो. हे असे कर्मचारी आहेत जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेत समाविष्ट नाहीत. केंद्रीय निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ मिळणार आहे. याशिवाय हंगामी कर्मचाऱ्यांनाही हा बोनस दिला जाणार आहे.

- Advertisement -

बोनसची रक्कम कशी ठरवली जाते?

कर्मचार्‍यांच्या सरासरी पगाराच्या आधारावर कमाल मर्यादेनुसार, जी रक्कम असेल त्यानुसार बोनस दिला जातो. 30 दिवसांचा मासिक बोनस सुमारे एक महिन्याच्या पगाराइतका असेल.

उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याला 18000 रुपये मिळत असतील, तर त्याचा 30 दिवसांचा मासिक बोनस अंदाजे 17 हजार 763 रुपये असेल. गणनेनुसार, रु 7000*30/30.4 = रु. 17,763.15 (रु. 17,763).

- Advertisement -

बोनसचा लाभ 31 मार्च 2023 पर्यंत सेवेत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळेल. 2022-23 या वर्षात किमान सहा महिने सतत ड्युटी केली आहे. एडहॉक बेसवर नियुक्त केलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांनाही हा बोनस मिळणार आहे. मात्र सर्व्हिसमध्ये कोणताही खंड पडू नये, अशी अटही घालण्यात आलेली आहे.

बोनससाठी काय नियम आहेत?

31 मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी सेवेतून बाहेर पडलेले, राजीनामा दिलेले किंवा निवृत्त झालेले असे कर्मचारी विशेष प्रकरण म्हणून गणले जातील. या अंतर्गत जे कर्मचारी अवैधरित्या सेवानिवृत्त झाले आहेत किंवा वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपूर्वी मरण पावले आहेत, परंतु त्यांनी आर्थिक वर्षात सहा महिने नियमित ड्युटी केली आहे, तेदेखील बोनससाठी पात्र मानले जातील.

आणखी हे निर्णय घेतले जाऊ शकतात

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दिवाळीनिमित्त मोठी वाढ होऊ शकते. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए वाढ) वाढवून दिवाळीची भेट देऊ शकते. याआधी दसऱ्यापर्यंत याची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, आता दिवाळीच्या निमित्ताने महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यातही वाध करू शकते. महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढून 46 टक्के होण्याची शक्यता आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत महागाई भत्त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

(हेही वाचा: Israel – Hamas War : इस्रायलकडून गाझा पट्टीवर सर्वात मोठा हल्ला, रुग्णालयातील स्फोटात 500 जणांचा मृत्यू)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -