घरक्राइममोठी बातमी: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर अटक

मोठी बातमी: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर अटक

Subscribe

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील हा चेन्नईत लपून बसला होता. त्याच्या शोधासाठी दहा पथकं तयार करण्यात आली होती. अखेर 17 ऑक्टोबरला, मंगळवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील हा चेन्नईत लपून बसला होता. त्याच्या शोधासाठी दहा पथकं तयार करण्यात आली होती. अखेर 17 ऑक्टोबरला, मंगळवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ललित पाटीललला आता पुण्यात आणलं जाणार आहे. त्यानंतर त्याला कोर्टात सादर केलं जाईल. ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने आता ड्रग्जप्रकरणातील अनेक बड्या माफियांची नावं बाहेर येण्याची शक्यता आहे. (Big news Drug mafia Lalit Patil finally arrested in chennai Mumbai police arrest him)

काय आहे प्रकरण?

पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

- Advertisement -

या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा मात्र फरार झाला होता. पोलिसांच्या हातावर तुरी देत ललित फरार झाल्याने पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढले जात होते.

ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. येथे 9 महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या नाकावर टिच्चून फरार झाला. पोलिसांनी चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: एक ‘मॅडम कमिशनर’ आणि अनेक भांडाफोड; अजित पवारांना भिडणाऱ्या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण? )

अनेक नावं समोर येण्याची शक्यता

ललित पाटील याला ससून रुग्णालयात सर्व सुविधा पुरवल्या जात असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ उडली होती. त्यानंतर आरोपांची राळही उठली होती. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं होतं. ड्रग्ज माफिया असलेल्या ललितला कोण सुविधा पुरवत होतं?  रुग्णालयातून तो ड्रग्ज रॅकेट कसं चालवत होता? त्याच्यामागे कुणाकुणाचं पाठबळ होतं?  याचा उलगडा आता होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -